Monsoon Update: देशभरात हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे परिस्थिती बेकाबू बनली आहे. त्याचवेळी डेहराडूनमध्ये पावसाचा जोर कायम आहे. IMD नुसार मुंबईत पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस (Rain) सुरू राहणार आहे.
बिहार, झारखंडमध्ये हवामानात सातत्याने बदल होत राहतील. दरम्यान, बिहारमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर उत्तर प्रदेशातील काही भागात रिमझिम पाऊस पडू शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.
राजधानी दिल्लीतही पावसाच्या (Monsoon) सऱ्या बरसणार असल्याचे भाकीत हवामान विभागाने वर्तवले आहे. दिल्लीत शनिवारपासून पाऊस सुरू होणार आहे. यामुळे आकाशात ढग बघायला मिळतील. या कालावधीत दिल्लीत (Monsoon News) किमान तापमान 30 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि गोव्यात सलग 5 दिवस मुसळधार पावसाचा (Heavy Rain) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचवेळी मुंबईत पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. याशिवाय, आयएमडीने आसाम, मेघालय, मणिपूरमध्ये यावर्षी जूनमध्ये सर्वाधिक 858.1 मिमी पावसाची नोंद केली आहे.
मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान गुजरात पंजाब हरियाणा आणि नवी दिल्ली येथेही हवामानात बदल दिसून येईल. आकाश ढगाळ राहील. पावसाचा जोर कायम राहणार आहे. वादळाचा इशारा नुकताच जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, गुरुवारी दिल्लीत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. बुधवारी दिवसभर दमट झाल्यानंतर कमाल तापमान 38.6 अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना रात्री उशिराही दिलासा मिळाला नाही.
गुरुवारी पहाटे किमान तापमान 30 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे वर्षाच्या या वेळी सामान्य तापमानापेक्षा दोन अंशांनी जास्त होते. जारी केलेल्या अपडेटमध्ये, IMD ने म्हटले आहे की गेल्या 24 तासांमध्ये नोंदलेली कमाल आर्द्रता 83% आहे. गुरुवारी सकाळी 8.30 वाजता सापेक्ष आर्द्रता 75 टक्के होती.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागात पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड भागात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि पाणी साचले असून आर्थिक राजधानीतील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
IMD च्या प्रादेशिक हवामान विभागानुसार, 7 जुलै ते 10 जुलै दरम्यान मुंबई आणि इतर ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य भारतावरील कमी दाबाच्या क्षेत्राच्या मदतीने, नैऋत्य मोसमी पावसाने वेग पकडला असून, या भागात खरीप पिकांच्या पेरणीसाठी भरपूर पाऊस झाला आहे.
मध्य भारत आणि पश्चिम किनारपट्टीवर पुढील पाच दिवस सक्रिय मान्सूनची स्थिती अनुभवायला मिळेल, तर देशाच्या वायव्य भागात गुरुवारपासून मोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चार यंत्रणा सक्रिय आहेत.
याचा परिणाम मध्य प्रदेश, छत्तीसगडसह बंगालमध्ये दिसून येत आहे. या ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे. याच भागात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील काही भागात आज तापमानात 2 टक्क्यांची वाढ नोंदवली जाऊ शकते. दुसरीकडे, बिहारमध्येही काही दिवसांत तापमानात एक ते दोन टक्क्यांनी वाढ होणार आहे.