Monsoon Update: सध्या राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Rain) पडत आहे, मात्र काही ठिकाणी अजूनही अपेक्षित असा मोसमी (Monsoon) पाऊस बघायला मिळालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे.
गेल्या रात्री राजधानी मुंबई, मुंबई उपनगर व ठाण्यात रात्रभर पाऊस पडत होता. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरे पाहता जूनचा पहिला पंधरवडा मोसमी पावसाविनाचं महाराष्ट्राला काढावा लागला, मात्र जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात मोसमी (Monsoon News) पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने राज्यातील अनेक भागात मोसमी पावसाने हजेरी लावली.
यामुळे राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) समाधानी असल्याचे चित्र होते, शिवाय राज्यात पेरणीच्या कामाला देखील आता वेग आला आहे. मात्र असे असताना राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी देखील वाढले आहे.
दरम्यान गडचिरोलीत देखील तब्बल पंधरा दिवसांनंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गडचिरोली शिवाय चंद्रपूर मध्ये देखील चांगला समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ज्या ठिकाणी अजूनही अपेक्षित असा पाऊस झालेला नाही अशा ठिकाणी शेतकरी बांधवांची डोकेदुखी कायम आहे.
अशा जिल्ह्यातील शेतकरी बांधव अजूनही पेरणीसाठी वरुणराजाची वाट पाहत आहेत. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या मते, दक्षिण कोकणात येत्या पाच दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे.
याशिवाय भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः घाट सेक्शनमध्ये पुन्हा एकदा मोसमी पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे निश्चितच दक्षिण कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आनंदी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
येत्या चार ते पाच दिवसात दक्षिण कोकणात मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने कोकणातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दक्षिण कोकणातील जिल्ह्यांना दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
या शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे तसेच इतर जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्याच्या घाट शिक्षण मध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागात उद्या आणि परवा जोरदार पाऊस बरसणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.