Monsoon News : मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या मान्सूनच्या चार महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. ऑक्टोबर चा पहिला पंधरवड्यात देखील राज्यात चांगला जबरदस्त पाऊस झाला. 5 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला.
मात्र परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासातच परतीचा प्रवास थबकला. नंदुरबारच्या वेशीजवळच मान्सूनचा परतीचा प्रवास रखडला. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला वेग मिळाला.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने आता मानसून महाराष्ट्रातून निघून गेला असल्याची घोषणा करण्यात आली आहे. अखेर कार मान्सून ने महाराष्ट्राला अलविदा केले आहे. तथापि अजूनही राज्यातील काही भागांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
मात्र हा पाऊस मान्सूनचा पाऊस राहणार नाही. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे मान्सून परतला आहे मात्र राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अजूनही पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
या पार्श्वभूमीवर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील या संबंधित जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस देशातून परतला आहे मात्र दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रिय झाला आहे.
याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे. तथापि मानसून महाराष्ट्रातून हद्दबाहेर झाला असल्याने महाराष्ट्रातील दिवसाचे कमाल तापमान हे उल्लेखनीय वाढले आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान हे वाढले असल्याची नोंद करण्यात आली आहे. तथापि दिवसाचे कमाल तापमान वाढले असले तरी सायंकाळच्या वेळी राज्यातील वातावरणात गारवा पाहायला मिळतोय. दरम्यान आगामी 24 तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे येत्या 24 तासात राज्यातील कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्र विभागातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर इथं विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे.