Monsoon News : भारतीय हवामान खात्याने परतीच्या पावसा संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. खरंतर पाच ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातून मान्सून ने काढता पाय घेतला आहे. नंदुरबार मधून मान्सून माघारी फिरल्यानंतर आता खऱ्या अर्थाने परतीच्या पावसाची व्याप्ती वाढत आहे.
महाराष्ट्रात सध्या ऑक्टोबर हिट मुळे जनता हैराण झाली आहे. ऑक्टोबर हिटमुळे दिवसाचे कमाल तापमान वाढत असून यामुळे उकाडा जाणवत आहे. अशातच मात्र राज्यात परतीच्या पावसाचे सत्र सुरु झालंय. महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये सध्या परतीच्या पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
यामुळे या भागातील नागरिकांना वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते मात्र आता परतीच्या पावसाचा जोर वाढत असल्याने या नागरिकांना दिलासा मिळालाय. पण, परतीचा पाऊस राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान करण्याची भीती व्यक्त होत आहे.
सोयाबीन कापूस मग अशा विविध पिकांची सध्या हार्वेस्टिंग सुरू असून या पिकांचे नुकसान होऊ शकते असे बोलले जात आहे. याशिवाय द्राक्ष सारख्या इतर फळ पिकांचे देखील हा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याची भीती आहे. तथापि हा परतीचा पाऊस आगामी रब्बी हंगामासाठी फायदेशीर ठरणार आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तास जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच कमाल तापमानात वाढ होऊन उकाड्यात वाढ होण्याची शक्यता देखील नाकारून चालणार नसल्याचे हवामान खात्यातील तज्ञांनी म्हटले आहे.
म्हणजेच महाराष्ट्रात वाढत्या उकाड्यासोबतच परतीच्या पावसाची देखील शक्यता असते. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात सध्या हे विषम हवामान अनुभवायला मिळत असल्याचा दावा हवामान तज्ञांनी केला आहे.
राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे पण बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे येत असून यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान चांगल्या जोराच्या पावसाची शक्यता आहे.
हे चार दिवस महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवेच्या वरच्या स्थरात उष्ण आणि कोरडे वारे बाष्पयुक्त वाऱ्यांमध्ये मिसळून पावसासाठी पूरक परिस्थिती तयार होत आहे.
मुंबई शहरासह उपनगरात दिवसा तापमानात वाढ होणार आहे मात्र सायंकाळी तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता सुद्धा आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यात यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असा अंदाज आहे. यानुसार येत्या काही दिवसात राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो.