Monsoon News : मान्सून संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. उकाड्याने हैराण झालेली जनता आणि शेतकरी बांधव अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने 19 मेला मान्सूनचे अंदमानात आगमन होणार असा अंदाज जाहीर केला होता. यानुसार आज मान्सूनचे अंदमानात आगमन झाले आहे.
भारतीय हवामान विभागाने आज मान्सून अंदमानात पोहोचला असल्याचे जाहीर केले आहे. नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागात आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं आहे. यामुळे सध्या संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मान्सूनचे अंदमानात हवामान खात्याने सांगितलेल्या वेळेतच आगमन झाल्याने आता मान्सूनचा पुढील प्रवास देखील हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे होईल अन मान्सून काळात चांगला पाऊस पडेल अशी आशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागली आहे.
केरळात कधी पोहचणार ?
भारतीय हवामान विभागाने दाखल होणार आहे. मात्र या तारखेत तीन-चार दिवस मागे पुढे होऊ शकतात असेही आयएमडीने स्पष्ट केले आहे.
म्हणजेच 28 मे ते 3 जून या कालादिलेल्या माहितीनुसार 19 मेला अंदमानात दस्तक दिल्यानंतर मानसून 31 मे च्या सुमारास केरळमध्येवधीत केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. साधारणपणे मान्सून हा पाच जून च्या सुमारास गोव्यात दाखल होतो. यानंतर सात ते आठ जूनला मान्सूनचे महाराष्ट्रातील तळ कोकणात म्हणजेच सिंधुदुर्गात आगमन होते.
पुढे मग मानसून दहा जूनला मुंबईमध्ये सलामी देत असतो. यानंतर मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो. 15 जूनच्या आसपास मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून घेतो. विदर्भात देखील 15 जूनला मान्सूनचे आगमन होते.
पुण्यातही दहा जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होत असते. यंदाही याच नियोजित वेळेत मान्सून महाराष्ट्रात येईल अशी आशा आहे. निश्चितच असे झाल्यास राज्यातील शेतकऱ्यांसहित सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या वर्षी राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळामुळे मोठा फटका बसला होता. यंदा मात्र मानसून काळात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवाय मान्सून वेळेतच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या साऱ्या गोष्टी शेती क्षेत्रासाठी मोठ्या फायदेशीर ठरणार आहेत.