Monsoon 2025 : 2023 मध्ये महाराष्ट्राला दुष्काळाची झळ बसली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला होता. एल निनोच्या प्रभावामुळे गेल्या वर्षी महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये दुष्काळ पाहायला मिळाला. मान्सून काळात अपेक्षित पाऊस झाला नाही.
2024 चे वर्ष मात्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले. यावर्षी मान्सून काळामध्ये आपल्या महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण हे समाधानकारक राहीले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची नोंद करण्यात आली.
दरम्यान येत्या काही दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि या नव्या वर्षात मान्सून कसा राहणार? याबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. अशातच जागतिक हवामान विभागाने 2025 च्या मान्सून संदर्भात महत्त्वाचे अपडेट दिली आहे.
पुढील वर्षी मान्सून काळात महाराष्ट्रात पाऊसमान कसे राहणार याबाबत जागतिक हवामान विभागाने मोठी माहिती दिली आहे. आता आपण जागतिक हवामान विभागाचा हाच अंदाज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय म्हणतंय जागतिक हवामान विभाग ?
जागतिक हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, पुढील वर्षी 2025 मध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी या काळात जगभरात ला निनासाठी अनुकूल वातावरण बनत असून, या काळात ला निना सक्रिय होण्याची शक्यता 55 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा ला निना सक्रिय असतो तेव्हा भारतात मान्सून काळात चांगला पाऊस बरसतो. सरासरी एवढा किंवा सरासरी पेक्षा अधिकचा पाऊस मानसून काळात होतो.
2025 मध्ये ला-निना सक्रिय राहणार आहे आणि याचा प्रभाव म्हणून मान्सून काळात सरासरी एवढा किंवा सरासरी पेक्षा जास्तीचा पाऊस बरसणार असा अंदाज आहे. जागतिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार या वर्षी भारतात ला निना सक्रिय राहाण्याचा अंदाज आहे, त्यामुळे यंदा पावसाचं प्रामाण हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात 2025 मध्ये मान्सून कसा राहणार याबाबतही जागतिक हवामान विभागाने मोठी माहिती दिलेली आहे. जागतिक हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, पुढील वर्षी आपल्या महाराष्ट्रात देखील सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जूनपर्यंत स्थिती अशीच राहिली तर राज्यात सुद्धा मान्सून काळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. नक्कीच पुढील वर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिले तर याचा शेती क्षेत्राला मोठा फायदा होणार असून शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढणार आहे.