Monsoon 2024 Update : मान्सून संदर्भात आत्ताची सर्वात मोठी आणि अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर सप्टेंबर महिना सुरू झाला की साऱ्यांना वेध लागते ते परतीच्या पावसाचे. परंतु यंदा मात्र अजूनही परतीचा पाऊस सुरू झालेला नाही. यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास लांबण्याचे कारण काय? याच संदर्भात आता आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली आहे.
आज दुपारी 12 नंतर राज्यातील काही भागात ढगाळ हवामान तयार झाले आहे. मात्र कुठेच जोरदार पाऊस बरसलेला नाही. तथापि उद्यापासून अर्थातच 20 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार असा अंदाज आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात या काळात जोरदार पाऊस होणार असा अंदाज आहे. जुलै ते सप्टेंबर हे चार महिने मान्सूनचे असतात. मात्र या चार पैकी तीन महिन्यातच महाराष्ट्रात सरासरी पेक्षा जास्तीचा पाऊस झाला आहे. महाराष्ट्रासारखीच परिस्थिती देशातील बहुतांश राज्यांमध्ये पाहायला मिळतं आहे.
महत्त्वाचे म्हणजे यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास पुढे ढकलला गेला अर्थातच देशात आणखी काही दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. अशा परिस्थितीत पावसाचे प्रमाण आणखी वाढणार आहे. मात्र यामुळे देशातील शेतकऱ्यांचे नुकसानही होत आहे. दरम्यान आज आपण मान्सूनचा परतीचा प्रवास लांबण्याचे नेमके कारण काय आहे? याबाबत तज्ञांनी काय सांगितलंय याविषयी माहिती पाहणार आहोत.
काय म्हणतात हवामान तज्ञ?
हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात एक खोल दबाव, एक डीप डिप्रेशन तयार झाले आहे. याचा प्रभाव म्हणून गंगा मैदानी प्रदेशात कमी तीव्रतेचे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा प्रभाव राजधानी दिल्लीतही पाहायला मिळू शकतो.
यामुळे जोरदार वादळी वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता बळावली आहे. पावसाळ्यात कमी दाबाची यंत्रणा तयार होणे ही एक सामान्य बाब आहे. याला मान्सून लो म्हणतात, जो नंतर तीव्र होऊन मान्सून डिप्रेशन मध्ये परावर्तित होत असतो.
पावसाळ्यात निर्माण झालेली ही कमी दाबाची क्षेत्रे आणि दाब दीर्घकाळ टिकतात. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ढासळलेल्या शहरी विकासामुळे जंगल आणि काँक्रीटमध्ये संतुलन राहिलेले नाही, त्यामुळे पूरस्थिती निर्माण होत आहे आणि जमिनीवर आधारित चक्रीवादळाची समस्याही वाढत आहे.
त्याच वेळी, कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात वाढ झाल्यामुळे, मान्सूनचा हंगाम दीर्घ कालावधीसाठी चालू राहतो आणि पावसाची तीव्रता देखील वाढत आहे. यंदाही यामुळे मान्सूनचा मुक्काम लांबणार असे दिसत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, उत्सर्जन वाढल्यास अतिवृष्टीची तीव्रता 58 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (IITM) केलेल्या अभ्यासात हे दिसून आले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, या शतकाच्या अखेरीस भारतात अतिवृष्टीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा जास्त परिणाम पश्चिम घाट आणि मध्य भारतावर होणार आहे.
शास्त्रज्ञ जस्ती एस चौधरी यांच्या मते, शतकाच्या अखेरीस अतिवृष्टी असलेल्या एकूण दिवसांची संख्या सध्याच्या चार दिवसांवरून दरवर्षी नऊ दिवसांपर्यंत वाढू शकते. मान्सूनचा पाऊस 6 ते 21 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या भारतातील 8 टक्के भागात जास्त पाऊस पडतो.