Monsoon 2024 : गेल्या अनेक दिवसांपासून मान्सून 2024 संदर्भात मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. शेतकरी बांधव मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. दरम्यान चातकासम मान्सून आगमनाची वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी एक कामाची बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून मान्सूनची खबरबात समोर आली आहे.
हवामान खात्याने माणूस सध्या कुठे आहे, त्याची प्रगती कशी सुरू आहे, मानसून केरळला कधी येणार या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. खरे तर नुकत्याच चार दिवसांपूर्वी अर्थातच 19 मे 2024 ला मान्सूनचे अंदमानत आगमन झाले. मान्सून बंगालच्या उपसागरासह अंदमान, निकोबार बेटांकडे दाखल झाला आणि त्याच्या चर्चा सुरू झाल्यात.
इकडे शेतकरी बांधवांनी शेती कामांना वेग दिला. सर्वसाधारणपणे 22 मे च्या सुमारास मानसून अंदमानात येत असतो यंदा मात्र तो दोन-तीन दिवस लवकरच अंदमानत पोहोचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसहित सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर तेजी आली आहे. मान्सून चांगला राहिला तर शेती क्षेत्राला मोठा फायदा होतो.
यामुळे शेतकऱ्यांसहित शेतीशी निगडित लोकांमध्ये देखील सध्या मोठे प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच 19 मे ला अंदमानात दाखल झालेला मान्सून आता वेगाने पुढे सरकत असल्याची माहिती आयएमडीने दिली आहे. अनुकूल आणि पोषक वातावरणामुळे Monsoon ने अंदमान आणि निकोबारचा संपूर्ण भाग व्यापला आहे.
आता त्याची पुढील वाटचाल सुरू झाली आहे. काल बुधवारी अर्थातच 22 मे 2024 ला मान्सूनने अंदमान, निकोबार बेटांसह मालदीवचा काही भाग, कोमोरीन, बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग व्यापला आहे.
विशेष म्हणजे येत्या 48 तासात मानसून अंदमान, निकोबार बेटांच्या उर्वरित भागासह अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागरातील मध्यभागासह इतर भागांत दस्तक देणार असे IMD ने आपल्या नवीन बुलेटिनमध्ये स्पष्ट केले आहे.
तसेच मान्सूनसाठी अशीच पोषक आणि अनुकूल परिस्थिती आणखी काही काळ कायम राहिली तर हवामान खात्याने जाहीर केलेल्या तारखेलाच मान्सूनचे केरळात आगमन होणार अशी माहिती हवामान तज्ञांनी दिली आहे.
हवामान खात्याने 31 मे 2024 ला मान्सूनचे केरळात आगमन होणार असे म्हटले आहे. अर्थातच येत्या आठ दिवसात मान्सून केरळात पोहोचण्याची दाट शक्यता आहे. मान्सूनचे केरळात आगमन झाल्यानंतर तो पुढे गोवा आणि महाराष्ट्राच्या तळकोकणात दाखल होणार आहे.
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दक्षिण केरळच्या भागात चक्रीय स्थिती सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, बंगालच्या मध्य-पूर्व भागापासून ते उत्तर तामिळनाडू ते दक्षिण कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे उद्या अर्थातच 24 मेपर्यंत या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार अशी दाट शक्यता आहे. दरम्यान, या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून जलद गतीने पुढे सरकणार आहे. 25 मे ला मान्सून बंगालच्या उपसागरातील ईशान्य भागाकडे सरकणार आहे.