Monsoon 2024 : फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली आहे. मान्सून आता अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपला आहे. येत्या चार महिन्यात मान्सूनला सुरुवात होणार आहे. यामुळे सर्वांनाच यंदाचा मान्सून कसा राहणार याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला आहे. कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळाला आहे.
शेतकऱ्यांना खूपच कमी उत्पन्न मिळाले आहे. कमकुवत मान्सूनमुळे खरीप आणि रब्बी हंगाम प्रभावित झाले आहेत. हवामान तज्ञांनी गेल्या वर्षी प्रशांत महासागरातील एल निनोमुळे कमी पाऊस झाल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.
अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांच्या माध्यमातून मान्सून 2024 मध्ये पाऊस कसा राहणार, याही वर्षी एल निनो सक्रिय राहणार का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान भारतीय हवामान खात्याने एल निनो संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. यावरून येत्या मानसून मध्ये पाऊसमान कसे राहणार? याचा अंदाज बांधता येणार आहे.
काय म्हणतंय हवामान विभाग
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरात सक्रिय असलेले एलनिनोची स्थिती फेब्रुवारी महिन्यात देखील कायम राहणार आहे. फेब्रुवारी महिन्यात एलनिनो सक्रिय राहणार आहे.
परंतु ही परिस्थिती फेब्रुवारीनंतर बदलणार आहे. पुढल्या महिन्यापासून एल निनो हळूहळू कमजोर होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. याच संदर्भात हवामान खात्याचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.
महापात्रा यांनी म्हटल्याप्रमाणे, प्रशांत महासागरात एल-निनोची स्थिती सध्या कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. तेथील समुद्रातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे. तसेच फेब्रुवारी अखेरपर्यंत ही स्थिती कायम राहील असा अंदाज आहे.
पण, फेब्रुवारीनंतर एल-निनो स्थिती हळूहळू कमजोर पडणार असे IMD ने म्हटले आहे. जर हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे घडलं तर यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच मान्सून 2024 मध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे.
तसेच हिंदी महासागरातील द्वि-धुव्रिताही सध्या सक्रिय आहे. पुढील एक दोन महिन्यांत ही स्थिती सुद्धा तटस्थ अवस्थेत पोहचण्याची शक्यता आहे.
एकंदरीत यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस होईल असे मत हवामान तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता हवामान खात्याचा आणि हवामान तज्ञांचा हा अंदाज खरा ठरणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.