Monsoon 2024 : गेली काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय होणार असे संकेत मिळतं आहेत. मान्सूनचा पुन्हा एकदा मूड बदलला आहे. खरे तर दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात राज्यात खूप मोठा पाऊस पडत असतो. मात्र गत दोन वर्षांपासून गणेशोत्सवाच्या काळात राज्यात फारसा पाऊस पडत नसल्याचे चित्र पाहायला मिळालं आहे.
यंदाही गणेशोत्सवाच्या काळात राज्यात फारसा पाऊस झाला नाही. बाप्पाच्या आगमनाला अर्थातच सात सप्टेंबरला राज्यात पाऊस सक्रिय झाला होता मात्र दोन-तीन दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसाची बरसात झाल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली.
गणरायाच्या विसर्जनाच्या दिवशी अर्थातच अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाराष्ट्रात मोठ्या पावसाचा अंदाज देण्यात आला होता. मात्र, पावसाने अनंत चतुर्दशीलाही चकवा दिला. पण आता राज्यात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज हवामान खात्याने नुकताच जाहीर केला आहे.
हवामान खात्याच्या नवीन अंदाजानुसार राज्यात उद्यापासून पाऊस सक्रिय होणार आहे. 20 सप्टेंबर पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार असून 20 21 आणि 22 सप्टेंबरला राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडू शकतो ? या संदर्भात भारतीय हवामान खात्याने काय सांगितलंय ? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार पुढील तीन दिवसांच हवामान ?
शुक्रवार : उद्या शुक्रवारी राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या विभागात पावसाची शक्यता आहे. खानदेशातील जळगाव आणि मध्य महाराष्ट्रातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना उद्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शनिवार : शनिवारी पावसाची तीव्रता शुक्रवारच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता आहे. कारण की शनिवारी पाऊस विदर्भात देखील सक्रिय होणार आहे. या दिवशी राज्यातील विदर्भ, मराठवाडा, अहमदनगर अन सोलापूर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
रविवार : रविवारी मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे. या दिवशी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून या अनुषंगाने विदर्भासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. पण उर्वरित भागात पावसाचा जोर कमी होणार आहे.