Mofat Shilai Machine Yojana : केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. सर्वसामान्यांचे हित जोपासनासाठी शासन नेहमीच तत्पर असते. शेतकरी, विद्यार्थी, महिला, कष्टकरी शेतमजूर, असंघटित कामगार अशा विविध घटकांसाठी शासनाच्या माध्यमातून अनेक कौतुकास्पद योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक हित जोपासले जात आहे. सर्वसामान्यांना यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. शासकीय योजनांचा लाभ घेऊन सर्वसामान्यांना आपला संसाराचा गाडा उत्तमरीत्या चालवता येत आहे.
मात्र, अलीकडे सरकारच्या नावे काही बनावट योजना देखील सुरु झाल्या आहेत. अशा बनावट योजनांच्या माध्यमातून मात्र सर्वसामान्यांची मोठी फसवणूक होते.
कष्टाने कमावलेले पैसे अशा बनावट योजनांद्वारे लुटले जात आहेत. यामुळे सर्वसामान्यांना कोणत्याही योजनेची सत्यता पडताळून पाहण्याचा सल्ला जाणकार लोकांनी दिले आहे.
कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांनी त्या योजनेची सत्यता तपासून पहावी असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे. सरकारच्या माध्यमातून देखील अशा बनावट योजनांपासून सर्वसामान्यांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून महिलांना मोफत शिलाई मशीन वितरित केले जात असल्याचे बोलले जात आहे.
व्हाट्सअप वर अशा आशयाचे मेसेज मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. विशेष म्हणजे व्हाट्सअप वर व्हायरल झालेल्या मेसेज मध्ये एका वेबसाईटची लिंक देखील दिली जात आहे.
यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही योजना खरच केंद्रातील सरकारच्या माध्यमातून राबवली जात आहे का हा सवाल सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.
दरम्यान याबाबतची पडताळणी केली असता केंद्र शासनाच्या माध्यमातून महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यासाठी कोणतीही योजना राबवली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यामुळे सदर आशयाच्या मेसेजवर लोकांनी विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या लिंक वर क्लिक करू नये अन्यथा त्यांच्या समवेत मोठी फसवणूक होऊ शकते असे जाणकार लोकांनी स्पष्ट केले आहे.