Mofat Gas Cylinder : महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची देखील घोषणा केली होती. यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ गेल्या काही दिवसांपासून वितरित केला जात आहे. लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आत्तापर्यंत तीन हप्ते मिळाले आहेत.
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र ठरणाऱ्या महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत भरून मिळणार आहेत.
यासाठी राज्यातील उज्वला योजनेच्या लाभार्थी महिला आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पात्र ठरणार आहेत. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावे गॅस कनेक्शन असणे आवश्यक राहणार आहे.
ज्या महिलांच्या नावे गॅस कनेक्शन आहे केवळ आणि केवळ अशाच महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महत्वाचे म्हणजे एका रेशन कार्डमधील एकाच महिलेला याचा लाभ मिळणार आहे.
अर्थातच कुटुंबातील एकाच महिलेला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय 30 जुलैला निर्गमित करण्यात आला होता.
सदर शासन निर्णयानुसार, राज्यातील उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. मात्र यासाठी पात्र महिलांना अर्ज सादर करावा लागणार आहे.
त्यामुळे जर तुम्हीही अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही लवकरात लवकर यासाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी त्यांच्या गॅस वितरकाकडे जाऊन एक अर्ज करायचा आहे.
महिलांनी मोफत गॅस सिलिंडरच्या लाभासाठी संबंधित गॅस सिलिंडर वितरकाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे, असे अकोला जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेली आहे.
अशा परिस्थितीत जर राज्यातील महिलांना एका वर्षात तीन मोफत गॅस सिलेंडर मिळालेत तर याचा त्यांना नक्कीच मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील कुटुंबांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर पुरु शकतात.
छोटे कुटुंबाला एका वर्षात साधारणता पाच ते सहा गॅस सिलेंडर आवश्यक असतात. अशा परिस्थितीत, जर सरकारकडून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळाले तर सर्वसामान्य गरीब कुटुंबाला याचा मोठा दिलासा मिळेल यात शंकाच नाही.