Mini Tractor Subsidy : राज्यातील शेतकऱ्यांसाठी नववर्ष सुरू होण्यापूर्वीच एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी पुन्हा एकदा अर्ज सुरू झाले आहेत. शासनाच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांकडून मिनी ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज मागविले जात आहेत.
खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील शेती व्यवसायात मोठा बदल पाहायला मिळत आहे. शेतीमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ लागला आहे. ट्रॅक्टर सारख्या यंत्रांमुळे आता शेतीचा व्यवसाय आधीच्या तुलनेत सोपा झाला आहे.
विशेषता बाजारात मिनी ट्रॅक्टर लॉन्च झाल्यापासून छोट्या शेतकऱ्यांना देखील शेती करताना मोठी मदत मिळत आहे. मात्र प्रत्येकच शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेणे जमत नाही. प्रत्येक शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ट्रॅक्टर घेण्यासारखी नसते. यामुळे शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अनुदान पुरवले जात आहे. शासन मिनी ट्रॅक्टर साठी शेतकऱ्यांना 90% पर्यंतचे अनुदान देत आहे.
दरम्यान, याच मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी पुन्हा एकदा नव्याने अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण या योजनेसाठी आवश्यक असलेल्या पात्रता आणि या योजनेसाठी इच्छुक शेतकऱ्यांना कुठे अर्ज करावा लागणार याविषयी थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या पात्रता
या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी शेतकरी पात्र राहणार आहेत. यासाठी नवबौद्ध किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरीच फक्त पात्र राहणार आहेत.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त 9 एचपी ते 18 एचपी पर्यंतचे ट्रॅक्टर घेण्यासाठी अनुदान पुरवले जाते.
ही योजना सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी नाहीये. म्हणजे फक्त SC कॅटेगिरी मधील शेतकऱ्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे.
याचा लाभ फक्त आणि फक्त नोंदणीकृत बचत गटांतील व्यक्तींनाच मिळतो.
ज्या बचत गटामध्ये 80 टक्के सदस्य अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील आहेत अशाच गटाला याचा लाभ मिळतो.
ट्रॅक्टर अनुदान योजनेचे स्वरूप थोडक्यात
राज्य शासनाची ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. नव बौद्ध समाजातील, अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचा उद्धार व्हावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने इत्यादीसाठी 90 टक्के अनुदान मिळते. ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनावर कमाल 3.15 लाख रूपये एवढे अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
अर्ज कुठं करावा लागणार ?
या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना दिला जात आहे. सहायक आयुक्त समाकल्याण येथे या योजनेसाठी अर्ज सादर केला जाऊ शकतो. मात्र अर्ज सादर करण्याच्या तारखांमध्ये जिल्हा निहाय बदल पाहायला मिळणार आहे. यामुळे या योजने संदर्भात सविस्तर असे अपडेट जाणून घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या समाज कल्याण विभागाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.