Millet Farming : भारतात बाजरी पिकाची (Millet Crop) मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राजस्थान मध्ये बाजरी पिकाची सर्वाधिक शेती (Farming) केली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील कमी अधिक प्रमाणात बाजरी पिकाची लागवड केली जाते.
खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात या पिकाची लागवड विशेष उल्लेखनीय असली तरीदेखील राज्यात बाजरीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत आहे. वाढलेला उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यामध्ये शेतकरी बांधवांना (Farmer) सांगड घालता येत नसल्याने एकेकाळी हमीचे पीक म्हणून समजल्या जाणाऱ्या बाजरी पिकाकडे आता शेतकरी बांधवांनी पाठ फिरवली आहे.
आता फक्त कोरडवाहू भागात बाजरी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. बाजरीचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत असल्याने आणि परिणामी उत्पादनात घट होत असल्याने बाजरीच्या बाजारभावात (Millet Rate) देखील अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढ नमूद करण्यात आली आहे.
मित्रांनो बाजरीची लागवड खरीप हंगामात देशात सर्वत्र केली जाते. बाजरी पिकात सध्या कणीसमध्ये दाणे भरली जात आहेत. अशा परिस्थितीत बाजरी पिकाचे व्यवस्थापन (Millet Crop Management) करणे देखील अति महत्त्वाचे ठरते. या अवस्थेत बाजरी पिकाची काळजी घेतल्यास शेतकरी बांधवांना या पिकातून चांगली कमाई (Farmer Income) होणार आहे.
स्टेम बोरर किंवा खोडकीडीचा प्रादुर्भाव
जाणकार लोकांच्या मते या कालावधीत बाजरी पिकात स्टेम बोरर नामक कीटकांचे कायमच सावट राहते. अशा परिस्थितीत या कीटकांवर नियंत्रण मिळवावे लागणार आहे. कीटकाच्या प्रादुर्भावामुळे बाजरी पिकाच्या उत्पादनात घट होत असल्याने जाणकार लोक या कीटकांवर वेळीच नियंत्रण मिळवण्याचा सल्ला देतात. अशा परिस्थितीत आज आपण स्टेम बोरर किंवा खोडकीड कीटकावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत.
स्टेम बोरर किंवा खोडकीडीचा प्रतिबंध
बाजरीच्या पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8 एसएल @ 0.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी.
अशा प्रकारे बाजरीचे उत्पादन वाढवता येणार आहे
जाणकार लोकांच्या मते, अनेकदा बाजरीचे कमकुवत पीकही कीड आणि रोगांना बळी पडते. अशा प्रकारे पिकांमधील पोषक तत्वांची कमतरता दूर करावी लागणार आहे. बाजरी पिकाच्या मजबुतीसाठी 25 किग्रॅ. नायट्रोजन आणि 500 ग्रॅम ह्युमिक ऍसिड बाजरी पिकासाठी वापरणे फायदेशीर राहणार आहे.