Mhada News : भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मायानगरी मुंबईत हक्काचे घर असावे असे स्वप्न अनेकांचे असते. मात्र मुंबईमध्ये गेल्या काही वर्षात घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. यामुळे अनेकजण म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात.
दरम्यान मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार म्हाडा मुंबई मंडळ लवकरच घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. या लॉटरीमध्ये गोरेगाव येथील गृह प्रकल्पातील पॉश घरांचा समावेश राहणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, म्हाडा मुंबई मंडळ गोरेगावमधील पहाडी परिसरातील गृहप्रकल्प तयार करत आहे. येथे प्रथमच Mhada ने 39 मजली निवासी इमारत बांधली आहे. विशेष म्हणजे या इमारतीमध्ये नागरिकांना विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
या गृहप्रकल्पात विविध सोयीसुविधा उपलब्ध होणार असल्याने या प्रकल्पात घर खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न आहे. जर तुमचेही असेच स्वप्न असेल तर तुमच्यासाठी मुंबई मंडळ लवकरच या गृहप्रकल्पातील घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे.
या प्रकल्पाचे काम जुन 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर मुंबई मंडळ जी लॉटरी काढेल त्यामध्ये या घरांचा समावेश केला जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकल्पातील उच्च आणि मध्यम गटातील 332 घरांसाठी 2025 ऐवजी 2024 मध्ये लॉटरी जाहीर होणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार ऑगस्ट 2024 मध्ये जी लॉटरी निघेल त्यामध्ये या घरांचा समावेश राहू शकतो. खरे तर या प्रकल्पातील 3000 काही घरांचा 2023 च्या लॉटरीमध्ये समावेश होता.
दरम्यान या 2023 च्या लॉटरीमध्ये जी घरे शिल्लक राहिलीत त्या घरांचा आता 2024 च्या लॉटरीत समावेश होणार आहे. तसेच गोरेगाव येथील या प्रकल्पातील उच्च आणि मध्यम गटातील सध्या काम सुरू असलेल्या 332 घरांचा देखील समावेश केला जाणार आहे.
या घरांचे काम खरेतर जून 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, मात्र 2024 च्या लॉटरीतच या घरांचा समावेश केला जाईल अशी शक्यता म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यात उच्च गटातील 227 आणि मध्यम गटातील 105 घरांचा समावेश राहणार आहे.
यातील उच्च गटातील घरांची किंमत सव्वा कोटीच्या आसपास राहू शकते आणि मध्यम गटातील घरांची किंमत 80 लाख रुपयांचे आसपास राहू शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
निश्चितच या चालू वर्षाच्या सोडतीत गोरेगावच्या या पॉश प्रकल्पातील घरांचा देखील समावेश राहणार असल्याने अनेकांचे घर खरेदीचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण होऊ शकणार आहे.