Mhada News : म्हाडा कडून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरांची उपलब्धता करून दिली जाते. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नासिक यांसारख्या महानगरात म्हाडा कडून सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असणारी घरे उपलब्ध करून दिली जातात. यासाठी म्हाडाकडून लॉटरी किंवा सोडत काढली जाते. यासाठी इच्छुक नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन केले जाते.
अर्ज करताना मात्र इच्छुकांना अनामत रकमेसह अर्ज करावा लागतो. यानंतर म्हाडाकडून प्राप्त झालेल्या पात्र अर्जांमधून घरांसाठी लॉटरी काढली जाते. या लॉटरीमध्ये यशस्वी ठरलेल्या लोकांना म्हाडाकडून घर उपलब्ध होत असतं. अशा परिस्थितीत जे लोक लॉटरीमध्ये यशस्वी ठरतात त्यांच्याकडून घेतलेली अनामत रक्कम म्हाडा परत करत असते.
मात्र अनेकदा अशा अयशस्वी ठरलेल्या अर्जदारांना वेळेत अनामत रक्कम मिळत नाही. यामध्ये प्रामुख्याने अर्जदाराकडून चुकीचा बँक खाते क्रमांक प्रविष्ट झाला तर अनामत रक्कम संबंधित लोकांना वेळेवर मिळत नाही. खरं पाहता लॉटरीचा निकाल लागला की सात ते आठ दिवसात भरलेली अनामत रक्कम संबंधितांना परत करण्याचा नियम आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! सर्वसामान्यांना लवकर घर मिळावे म्हणून म्हाडाला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्यात ‘या’ सूचना; म्हटले की…..
म्हाडा देखील विहित कालावधीमध्येच संबंधितांना रक्कम परत करत असते. पण अनेकदा संबंधित व्यक्तींकडून चुकीचा बँक खाते क्रमांक दिला गेल्यामुळे, किंवा बंद खाते दिल्यामुळे रक्कम मिळण्यास उशीर होतो. अशा अर्जदारांना मग कार्यालयात अनेकदा पायपीट करावी लागते. यामुळे म्हाडाला कायमच टीकेचा सामना करावा लागला आहे. दरम्यान आता यावर एक रामबाण उपाय म्हाडाने शोधून काढला आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळांने आता 2023 च्या सोडती पासून पिनि टेस्टिंग पद्धतीने अनामत रक्कम परत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या घर सोडतीसाठी इच्छुक अर्जदाराने बँक खाते नमूद केल्यानंतर मंडळाकडून या खात्यात एक रुपया जमा करण्यात येत आहे. या संबंधित व्यक्तीच्या खात्यावर एक रुपया जमा झाल्यानंतर बँक खाते क्रमांक योग्य असल्याची खात्री होणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आगामी ‘इतके’ दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा हाय अलर्ट
म्हणजे बँक खाते क्रमांक बंद नाही ना, तसेच चुकीचे बँक खाते नाही ना याची याद्वारे पडताळणी होणार आहे. मग मंडळाकडून एक रुपया प्राप्त झाल्यानंतर संबंधित अर्जदाराला अनामत रक्कम भरता येणार आहे. आता अनामत रक्कम भरतानाच बँक खात्याचे यशस्वीरीत्या पडताळणी झालेली असणार त्यामुळे सोडतीत अयशस्वी ठरलेल्या अर्जदाराची परताव्याची रक्कमही याच खात्यात जमा करण्यात येणार आहे.
त्यामुळे अनामत रक्कमेचा परतावा झटपट होऊ शकेल, असा दावा मंडळातील अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र या ठिकाणी एक गोष्ट विशेष अशी की, मंडळाने सुरुवातीला खात्यात भरलेला एक रुपया अर्जदारांना परत करावा लागणार आहे. निश्चितच म्हाडाने अनामत रकमेबाबत घेतलेला हा निर्णय घर सोडतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदारांसाठी फायदेशीर राहणार आहे.
हे पण वाचा :- कापसाच्या दरात मोठी घसरण ! आता दरवाढ होणार का? पहा याविषयी तज्ञांचे मत