Mhada News : म्हाडा कडून महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात घरांची उपलब्धता करून दिली जाते. आपल्या विविध विभागीय मंडळाच्या माध्यमातून म्हाडा दरवर्षी हजारो घरांसाठी लॉटरी काढत असते. कोकण मंडळांने देखील ऑक्टोबर मध्ये 2264 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. दरम्यान कोकण मंडळाने जाहीर केलेल्या याच लॉटरीच्या संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोकण मंडळांने या लॉटरीच्या अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. अर्जदारांच्या मागणीनुसार ही मुदत वाढ देण्यात आली आहे. कोकण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे.
अशा परिस्थितीत, आता आपण कोकण मंडळाच्या या लॉटरीच्या अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला किती दिवसांची मुदत वाढ मिळाली आहे आणि या सोडतीचे नवीन वेळापत्रक नेमके कसे आहे याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
किती दिवसांची मुदतवाढ मिळाली?
कोकण मंडळांनी 2264 घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी जाहीर केली आणि यासाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया 11 ऑक्टोबर पासून सुरू झाली आहे. दरम्यान आता या प्रक्रियेला 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आता आपण अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदत वाढ मिळाल्यानंतर या सोडतीचे वेळापत्रक कसे राहणार आहे याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत. यां सोडतीत सहा जानेवारी 2025 पर्यंत अर्जदारांना या घरांसाठी अर्ज करता येणार आहे. अनामत रक्कम 7 जानेवारी 2025 पर्यंत भरता येणार आहे.
तसेच, सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी २० जानेवारी, २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
त्यानंतर २२ जानेवारी, २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. २४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता सोडतीत सहभाग घेणार्या अर्जांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
तसेच 31 जानेवारी 2025 रोजी या घरांसाठी प्रत्यक्षात संगणकीय सोडत निघणार आहे. सकाळी दहा वाजता ही सोडत निघणार असून यानंतर या सोडतीमध्ये विजयी झालेल्या अर्जदारांना घराचा ताबा दिला जाणार आहे. तसेच जे अर्जदार यामध्ये विजयी होणार नाहीत त्यांना त्यांची अनामत रक्कम परत केली जाणार आहे.