Mhada News : मुंबई, पुणे, नाशिक, नागपुर, छत्रपती संभाजी नगर, अमरावती यांसारख्या महानगरात घरांच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. या महानगरात घर घेणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. अशा परिस्थितीत म्हाडाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या परवडणाऱ्या घरांची सर्वसामान्य आतुरतेने वाट पाहत असतात.
अशातच म्हाडाच्या माध्यमातून एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. म्हाडा लवकरच या महानगरात हजारो घरे उपलब्ध करून देणार आहे. येत्या आर्थिक वर्षात म्हाडा कडून या महानगरात तब्बल 12,724 घरे बांधली जाणार आहेत. म्हणजे येत्या आर्थिक वर्षात म्हाडाकडून जवळपास तेरा हजाराच्या आसपास घरांची सोडत काढली जाणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई, पुणेकरांसाठी खुशखबर ! Mumbai-Pune Missing Link प्रकल्प ‘या’ दिवशी होणार सुरु; वाचा सविस्तर
यासाठी म्हाडाच्या अर्थसंकल्पात पाच हजार आठशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये राजधानी मुंबईत 2152 घरे बांधली जाणार आहेत. यासाठी 3664.18 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. तसेच कोकण मंडळांतर्गत ५६१४ घरे बांधली जातील. यासाठी ७४१.३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त पुणे मंडळांतर्गत 862 घर उपलब्ध होणार आहेत, नागपूर मंडळांतर्गत 1417 घर उपलब्ध होणार आहेत. छत्रपती संभाजी नगर मंडळांतर्गत 1497 घर उपलब्ध होणार आहेत. नासिक मध्ये 751 घरे आणि अमरावती मध्ये 433 घरे म्हाडा कडून उपलब्ध होणार आहेत. निश्चितच म्हाडाने नुकताच सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी अति महत्त्वाचा असून येत्या आर्थिक वर्षात हजारो लोकांची घरांची स्वप्ने पूर्ण होणार आहेत.
म्हाडा ने नुकत्याच सादर केलेल्या दहा हजार 186 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मान्यता मिळाली असून यामुळे आता म्हाडाच्या विविध मंडळाकडून मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती केली जाणार आहे. घरांसाठी निधीची तरतूद देखील झाली असल्याने सर्वसामान्यांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. विशेषता मुंबई आणि कोकण मंडळात मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध करून देण्याचा मानस म्हाडाचा असल्याने मुंबई आणि कोकण मंडळामध्ये घर शोधणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग : ‘या’ दोन शहरादरम्यान धावणार 12वी वंदे भारत ट्रेन ! पहा संपूर्ण डिटेल्स….