Mhada News : म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळांतर्गत नेहमीच घरांची सोडत काढली जाते. सामान्य जनता देखील या घर सोडतीची आतुरतेने वाट पाहत असते. मुंबई आणि कोकण मंडळ अंतर्गत काढण्यात येणाऱ्या म्हाडाच्या घर सोडतीला कायमच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो.
यावर्षी देखील कोकण मंडळाने सोडत काढली आहे. यासाठीची अर्ज करण्याची मुदत मात्र शुक्रवारी संपली आहे. 4654 घरांसाठी आणि 14 भूखंडांसाठी कोकण मंडळाकडून यावेळी सोडत काढण्यात आली आहे. परंतु यावेळी 50000 पेक्षा कमी लोकांनी डिपॉझिट रकमेसह आपला अर्ज सादर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 48,919 अर्ज अनामत रकमेसह या घर सोडतीसाठी सादर झाले आहेत. यामुळे नेहमीच लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अर्जांची संख्या अचानक का घटली हाच मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या नवीन नियमानुसार कोकण मंडळाची ही सोडत पार पडत असल्याने याला कमी प्रतिसाद मिळाला आहे.
या नवीन नियमानुसार अर्जदाराला सर्व कागदपत्र अर्ज करताना सादर करावी लागत आहेत. यामुळे अनेक जणांना कागदपत्र उपलब्ध झाली नसल्याने वेळेवर अर्ज सादर करता आला नसल्याचे सांगितले जात आहे. आता सादर झालेल्या अर्जांची मंडळाकडून छानणी केली जाणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला ‘या’ गावात थांबा मिळणार? पहा काय म्हणाले रेल्वे अधिकारी
आता या छाननीनंतर स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी 27 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी ६ वाजता उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही प्रारूप यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच 4 मे 2023 रोजी स्वीकृत पात्र अर्जांची अंतिम यादी उपलब्ध होईल अशी माहिती देण्यात आली आहे.
म्हणजे आता चार मे 2023 रोजी या कोकण मंडळाच्या घर सोडतीत नेमके किती अर्जदार सहभागी होणार हे समजणार असल्याचे सांगितले जात आहे. ही अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष घर सोडत काढली जाणार आहे. ही सोडत म्हणजे लॉटरी 10 मे 2023 रोजी म्हणजे बुधवारी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात काढली जाणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! आता ‘या’ तीर्थक्षेत्राला जाणं झालं सोपं; एसटीची नवीन बससेवा सुरू, संपूर्ण रूटची माहिती वाचा इथं