Mhada News : म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 4654 घरांसाठीची सोडत जारी करण्यात आली आहे. खरं पाहता गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोकण आणि मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी नागरिकांकडून वाट पाहिली जात होते. इतर मंडळाच्या सोडतीच्या तुलनेत कायमच कोकण आणि मुंबई मंडळाच्या म्हाडाच्या घर सोडतीला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. यामुळे तब्बल दीड वर्षानंतर जारी करण्यात आलेल्या कोकण मंडळाच्या सोड तिला चांगलाच प्रतिसाद मिळेल अशी आशा कोकण मंडळाला लागून होती.
मात्र या सोडती संदर्भात एक मोठी आकडेवारी समोर आली आहे. यावरून कोकण मंडळाला ज्या पद्धतीने घर सोडतिला प्रतिसाद मिळण्याची आशा होती तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. हाती आलेल्या माहितीनुसार कोकण मंडळाच्या स्मृतीसाठी 21 मार्चपर्यंत मात्र 4784 लोकांनी अनामत रक्कम अर्थातच डिपॉझिट ची रक्कम भरून अर्ज सादर केला आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी! 12व्या वंदे भारत ट्रेनची घोषणा; देशातील ‘या’ दोन प्रमुख शहरादरम्यान धावणार, 8 एप्रिलला होणार लोकार्पण
आता अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होऊन जवळपास 13 दिवसांचा म्हणजेच एक पंधरवड्याचा काळ उलटला आहे. तरी देखील मात्र सोडतीला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याने निश्चितच कोकण मंडळाच्या घर सोडतीला नेमका प्रतिसाद का कमी झाला आहे हा एक विश्लेषणात्मक घटक राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 4,784 घरांमध्ये कोकण मंडळाची 2606 घरांसाठी आठ मार्चपासून अर्ज स्वीकृती सुरू झाली आहे.
तसेच प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेअंतर्गत या सोडतीमध्ये 2048 घरांचा समावेश असून यासाठी 17 मार्चपासून अर्ज स्वीकृती सुरू झाली आहे. दरम्यान आता या दोन्ही घरांसाठी 12 एप्रिल पर्यंत अनामत रकमेसह अर्ज सादर करता येणार आहे. यामुळे आगामी दिवसात अर्जांची संख्या वाढते का? जशी मंडळाला आशा होती तसा या सोडतीला प्रतिसाद मिळतो का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
हे पण वाचा :- उन्हाळी कांद्याला येणार अच्छे दिन! मागणी वाढण्याची शक्यता, पहा काय म्हणताय तज्ञ
आतापर्यंत म्हणजेच 08 मार्च ते 21 मार्च पर्यंत 9771 जणांनी यासाठी अर्ज भरले आहेत. यापैकी चार हजार 784 लोकांनी अनामत रकमेसह आपला अर्ज सादर केला आहे. वास्तविक पूर्वीच्या कोकण मंडळाच्या प्रत्येक घर सोडतिला लाखोच्या संख्येने अर्ज आले आहेत. यावेळी मात्र अर्जांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
म्हणजे या सोडतीला नागरिकांचा प्रतिसाद कमी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र कोकण मंडळाच्या अधिकाऱ्यांना अर्जांची संख्या वाढण्याची आशा आहे. अधिकाऱ्यांच्या मते, अजून 18 ते 20 दिवसांचा कालावधी आहे यामुळे शेवटच्या क्षणी अर्जांची संख्या निश्चितच वाढणार आहे.