Mhada News 2023 : मुंबई अन कोकण मंडळाच्या म्हाडा घर सोडतीकडे कायमच नागरिकांचे लक्ष लागून असते. गेल्या दीड वर्षांपासून मात्र मुंबई मंडळाची घर सोडत काढण्यात आलेली नाही. परंतु कोकण मंडळाकडून नुकतीच घर सोडत जारी करण्यात आली आहे. यासाठी अर्ज आणि अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया सुरू असून या घर सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 2048 प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या घरांसाठी देखील आता अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की कोकण मंडळ अंतर्गत एकूण चार हजार 654 घरांसाठीची सोडत जारी करण्यात आली आहे. यामध्ये 2048 ही प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेची घर आहेत. त्यासाठीच आजपासून अनामत रकमेसह अर्ज स्वीकृती सुरू झाली आहे.
यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर या प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेअंतर्गत असलेल्या घरांसाठी अर्ज करायचा आहे. खरं पाहता ही घरे विरार आणि बोळींची मध्ये आहेत. काही कारणास्तव म्हाडाची ही घरे वारंवार सोडतीमध्ये टाकूनही विक्री होऊ शकलेली नाहीत.
परिणामी ही घरे आता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेअंतर्गत या लॉटरीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या ठिकाणी एक विशेष गोष्ट अशी की, मुंबई अन कोकण मंडळात गेल्या काही वर्षांपासून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेअंतर्गत घर उपलब्ध होत नव्हती.
हे पण वाचा :- म्हाडाच्या घर सोडतीसाठी अनामत रकमेत बदल; आता ‘इतकी’ अनामत रक्कम ‘या’ तारखेपर्यंत भरावी लागेल
मात्र आता कोकण मंडळातील या वारंवार सोडती मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या घरांची विक्री झाली नसल्याने यांचा समावेश आता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेअंतर्गत करण्यात आला आहे. आज पासून या घरांसाठी अनामत रकमेचे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जे इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करायचा आहे.
जे पात्र व्यक्ती यासाठी सर्वप्रथम अनामत रकमेसह अर्ज करतील त्यांना या योजनेअंतर्गत घर वितरित केलं जाणार आहे. या घरांसाठी 12 एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार असून घरांची सर्वसाधारण किंमत वीस ते पंचवीस लाखांच्या घरात आहे. याची यादी ही दहा मे रोजी प्रकाशित होणार आहे.
हे पण वाचा :- Mhada Lottery : अखेर ठरलं ! म्हाडाच्या मुंबईतील घरांसंदर्भात मोठी अपडेट; ‘या’ महिन्यात जारी होणार सोडत