Mhada News : घरांच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे परवडत नाहिये. वाढत्या महागाईमुळे घरासाठी लागणारा पैसा सर्वसामान्यांकडे बचत होत नाही. महिन्यासाठी येणारा पैसा संसाराच्या गरजा भागवण्यातच निघून जातो. अशावेळी सर्वसामान्य नागरिक म्हाडाच्या घरांकडे पाहतात. म्हाडाची परवडणारी घरे सर्वसामान्यांसाठी फायद्याची ठरत आहेत.
Mhada च्या घरांमुळे आत्तापर्यंत हजारो लाखो नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मात्र असे असले तरी म्हाडा लॉटरी पद्धतीने घरांची विक्री करत असते आणि यामध्ये अनेकांना घरे मिळत नाहीत. दुसरीकडे मुंबईसारख्या शहरांमध्ये म्हाडाच्या घरांच्या किमती देखील आता विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या आहेत.
दरम्यान या अशा परिस्थितीत म्हाडाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार म्हाडाच्या माध्यमातून मुंबईमध्ये फक्त घरे विकली जाणार नाहीत तर घरे भाडेतत्त्वावर देखील दिली जाणार आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, विविध कारणांमुळे जसे की, कादपत्रांची पूर्तता न झाल्यास, पुरेसे पैसे उपलब्ध नसल्यास, लोकेशन मनासारखे नसल्यास किंवा लॉटरी मध्ये नंबर न लागणाऱ्या अनेकांना म्हाडाचे घरं खरेदी करता येत नाही.
मुंबईत स्वत:चे घर नसलेले तसेच शिक्षणासाठी आणि कामानिमित्ताने मुंबईत राहणाऱ्यांना भाड्याने घर घेऊन रहावे लागते. अशा लोकांना म्हाडाच्या या एका निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या लोकांना म्हाडाकडून भाड्याने घर याचा सर्वसामान्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.
म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे. एवढेच नाही तर म्हाडा पुढील पाच वर्षात अडीच लाख नवीन घरे मुंबई शहरात तयार करेल आणि परवडणाऱ्या घरांच्या किमती 30 टक्क्यांपर्यंत कमी करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई महानगर क्षत्रात 2030 पर्यंत म्हणजेच पुढील पाच वर्षांमध्ये सुमारे 30 लाखांहून अधिक घरांची उभारणी करण्याचा मानस सरकारकडून बाळगण्यात आला आहे. यातील सुमारे 8 लाख घरांच्या उभारणीची जबाबदारी म्हाडानं घेतली आहे. मुंबईतील तीन हजार हेक्टर जमिनीवर म्हाडा गृहनिर्माण प्रकल्प उभारणार आहे.
तसेच विविध इमारतीचा पुनर्विकास देखील केला जाणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पातून देखील म्हाडाकडे हजारो घर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. या विविध योजनांच्या माध्यमातून माळाकडे पुढील पाच वर्षात अडीच लाख घरे विक्रीसाठी उपलब्ध होतील अशी माहिती हाती येत आहे.