MHADA News : राजधानी मुंबई, नवी मुंबई सोडून पुणे, कोकण, नासिक, औरंगाबाद आणि नागपूर गृहनिर्माण मंडळाकडून लवकरच सर्वसामान्यांना मोठी भेट मिळणार आहे. या विभागात जवळपास एक लाख घरांची उपलब्धता म्हाडाकडे होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही घरे खाजगी विकासकांकडून विकसित केलेली राहणार आहेत.
खरं पाहता 2013 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडतील अशा घरांसाठी योजना सुरू केली होती. दरम्यान या योजनेत 2018 मध्ये मोठी सुधारणा करण्यात आली. या नवीन सुधारणेनुसार सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेचा अंतर्भाव या 2013 च्या योजनेत करण्यात आला.
याच्या माध्यमातून चार हजार चौरस मीटर किंवा त्यापुढील भूखंडावर गृहनिर्माण कार्य करतांना विकासकांना आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी 20% घर बांधण्याचा नियम तयार झाला. ही विकासकांनी तयार केलेली घरे मात्र म्हाडाकडे सुपूर्द करून सोडत द्वारे सर्वसामान्यांना देण्याचा निर्णय देखील झाला. या घरांसाठी येणारा खर्च हा म्हाडा कडून उचलला जातो, म्हणजेच यासाठी 20% अधिक चटई क्षेत्रफळ म्हणजेच कार्पेट एरिया विकासकांना उपलब्ध होत असतो.
विशेष म्हणजे अनेक विकासाकांनी या योजनेचा लाभ घेतला. परंतु विकासाकांनी अधिकचे चटई क्षेत्रफळ घेऊनही म्हाडाला ही 20% घरे सुपूर्द केले नाहीत. वास्तविक 2018 मध्ये जेव्हा या योजनेत सुधारणा झाली त्यावेळी म्हाडाला घर सुपूर्द केल्याशिवाय संबंधित महापालिकांनी निवास योग्य प्रमाणपत्र विकासकांना देऊ नये असे नमूद करण्यात आले होते.
मात्र तरीही महापालिकांनी या योजनेतील या तरतुदीकडे दुर्लक्ष करत, वीस टक्के घरे म्हाडाला वर्ग झाली आहेत की नाही हे विना तपासणी करता संबंधित विकासकांना निवास योग्य प्रमाणपत्र देऊन टाकलेत. निश्चितच, विकासाकांनी योजनेचा गैरवापर केला आहे. दरम्यान ही बाब नासिक गृहनिर्माण मंडळाला लक्षात आली.याचा पाठपुरावा केल्यानंतर आता नाशिक गृहनिर्माण मंडळाकडे या विकासकांकडून तब्बल 15000 घरे वर्ग होणार आहेत.
आता नासिक गृहनिर्माण मंडळाला लक्षात आलेली बाब आणि प्राप्त होणारी घरे पाहता म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांनी याबाबतची माहिती मागविली आहे.म्हणजेच आता नासिक गृहनिर्माण मंडळाप्रमाणेच पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नागपूर या गृहनिर्माण मंडळाकडे देखील विकासकांकडून मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होण्याचे चित्र तयार झाले आहे.
एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, म्हाडाकडे या विकासकांकडून तब्बल एक लाखांच्या आसपास घरे उपलब्ध होणार आहेत. यामध्ये नासिक गृहनिर्माण मंडळाकडे वर्ग करण्यात येणारे पंधरा हजार घरांचा देखील समावेश राहणार आहे. अशा पद्धतीने आता लवकरच एक लाख घरे सोडतीसाठी उपलब्ध होतील असा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचीं दखल दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घेतली आहे. त्यांनी याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच म्हाडाच्या उपाध्यक्षांनी देखील या संदर्भात योग्य ती माहिती जमवण्याचे आदेश दिले आहेत. निश्चितच, नाशिक गृहनिर्माण मंडळाच्या सावधानतेमुळे मोठा चुकीचा प्रकार उघडकीस आला असून यामुळे मंडळाकडे लवकरच 15000 घरे येणार आहेत.तसेच राज्यातील इतरही गृहनिर्माण मंडळाकडे अशाच प्रकारे हजारो घरे वर्ग होण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी मोठ्या प्रमाणात घरांची सोडत जारी होऊ शकते असा दावा केला जात आहे.
म्हाडा घेणार मोठा निर्णय वाचा :-:MHADA Lottery News : ब्रेकिंग ! म्हाडाच्या घरासाठी वास्तव्याची अट रद्द होणार ?