Mhada News : म्हाडाच्या घर सोडती संदर्भात एक मोठी माहिती हाती येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोकण मंडळाकडून लवकरच घर सोडतीसाठी जाहिरात काढली जाणार आहे. एकूण 4732 घरांच्या सोडतीसाठी पुढील आठवड्यात जाहिरात काढली जाण्याची शक्यता आहे.
एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार यासाठी म्हाडा प्राधिकरणाकडून आवश्यक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आता पुढल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होईल यावर शिक्कामोर्तब होत असल्याचे चित्र आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉटरी काढली जाणार असल्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
निश्चितच गेल्या अनेक दिवसांपासून कोकण मंडळ अंतर्गत या सोडतीसाठी वाट पाहिली जात होती. यामुळे नागरिकांसाठी ही एक निश्चितच दिलासादायक बातमी राहणार आहे. अशातच मात्र घर सोडतीची वाट पाहणाऱ्यांना एक झटका देखील म्हाडाकडून देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार म्हाडाच्या घर सोडते साठी अर्ज करताना आवश्यक असलेल्या डिपॉझिटमध्ये म्हणजेच अनामत रक्कम मध्ये आता वाढ करण्यात आली आहे. तब्बल दुपटीने यामध्ये वाढ झाली असल्याने सर्वसामान्यांना आता अनामत रक्कम म्हणून अधिकचा पैसा भरावा लागणार आहे. त्यामुळे निश्चितच सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढणार आहे.
हे पण वाचा :- MHADA Lottery News : ब्रेकिंग ! म्हाडाच्या घरासाठी वास्तव्याची अट रद्द होणार ?
एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार आता पीएमएवायसाठी अनामत रक्कम 25 हजारांवरून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य गटासाठी 1 लाख रुपये करण्यात येणार आहे. तसेच अत्यल्प गटासाठी 25 हजार रुपये, अल्प गटासाठी 50 हजार रुपये, मध्यम गटासाठी 75 हजार रुपये आणि उच्च गटासाठी 1 लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्यात येणार आहे. निश्चितच अनामत रक्कम वाढली असल्याने हा सर्वसामान्यांना एकच झटका आहे.
पण पुढल्या महिन्यात कोकण मंडळाकडून घर सोडत साठी जाहिरात प्रसिद्ध होणार असून यानंतर लगेचच अर्ज स्वीकृती सुरू होणार आहे. अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया जवळपास एक महिना सुरू राहील आणि त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाची सोडत काढली जाईल. ही सोडत मार्च महिन्यात काढली जाण्याची शक्यता असून लॉटरीमध्ये नाव आलेल्या नागरिकांना मग उर्वरित रक्कम भरून घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू होईल.