Mhada News : मोठमोठ्या महानगरात सर्वसामान्यांना घर घेणं म्हणजेच अलीकडे दिवसाढवळ्या गोड स्वप्न पाहणं असं झालं आहे. घरांच्या किमती गेल्या काही वर्षांपासून विक्रमी वाढल्या असल्याने सर्वसामान्यांना आता मुंबई, पुणे, औरंगाबाद, नासिक यांसारख्या महानगरात घर घेणे परवडणार नाहीये. अशा परिस्थितीत, नागरिकांकडून कायमच म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची वाट पाहिली जाते.
दरम्यान काल अर्थातच सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पुणे मंडळातील पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील 3120 घरांसाठीची सोडत काढण्यात आली आहे. ही सोडत ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आली असून पाडव्याच्या मुहूर्तावर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पुणे मंडळाअंतर्गत अर्ज केलेल्या आणि लॉटरीमध्ये निवड झालेल्या नागरिकांचा सणं गोड झाला आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आगामी ‘इतके’ दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा हाय अलर्ट
विशेष म्हणजे या सोडतीच्या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाला काही सूचना देखील दिल्या आहेत. फडणवीस यांनी सांगितले की, रोजगारासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा ने आपल्या प्रकल्पांना गती दिली पाहिजे.
सोबतच परवडणाऱ्या दरातील घर असल तरीदेखील सर्व सोयी सुविधा त्या घरांमध्ये असली पाहिजे अशी सूचना यावेळी फडणवीस यांनी दिली. याशिवाय म्हाडा अंतर्गत विकसित होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या घरांच्या बांधकामाचा दर्जा हा चांगला राखला गेला पाहिजे.
हे पण वाचा :- कापसाच्या दरात मोठी घसरण ! आता दरवाढ होणार का? पहा याविषयी तज्ञांचे मत
यासोबतच अधिक चे घरे सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाने नियोजन करून तातडीने सोडतीची प्रक्रिया राबवावी अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की काल झालेल्या पुणे मंडळाच्या सोडती अंतर्गत एकूण सहा हजार 58 घरे लाभार्थ्यांना दिली गेली आहेत.
यामध्ये पुणे मंडळातर्फे म्हाडा गृहनिर्माण योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना व प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेतील सदनिकांचा समावेश होता. विशेष म्हणजे या घर सोडतीमध्ये प्रथम येणाऱ्या प्राधान्य योजनेअंतर्गत 2938 घरांचा समावेश होता.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी दिलासादायक ! शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो मार्ग प्रकल्पाला मिळाली गती; 400 खांब तयार, केव्हा होणार पूर्ण काम?