Mhada Lottery News : मुंबई पुणे औरंगाबाद नासिक अशा महानगरात दिवसेंदिवस घरांच्या किमती आकाशाला गवस निघालात आहेत. या शहरात ज्या पद्धतीने बिल्डिंगचे मजले वाढत आहेत तसेच घरांचे दरही वाढले आहेत. यामुळे या महानगरात सर्वसामान्यांना हक्काचे घर करणे म्हणजेच दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे अशी गत झाली आहे. मात्र सर्वसामान्यांचे महानगरात घराची स्वप्नपूर्ती करण्यासाठी म्हाडाच्या माध्यमातून घर सोडत काढली जाते.
म्हाडा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देत असल्याने म्हाडाच्या घर सोडतीकडे सर्वसामान्यांचे कायमच लक्ष असते. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांचे म्हाडा घर सोडतीसंदर्भात अनेक प्रश्न देखील असतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि नेहमीच विचारला जाणारा प्रश्न म्हणजे म्हाडाची एकापेक्षा अधिक घर घेता येतात का? वास्तविक पाहता म्हाडाची घर सोडतीसाठी अनेक कडक नियम आणि अटी लावून देण्यात आल्या आहेत.
हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! सरकारी नोकर भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ झाली फिक्स; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार निर्णय
या अटींचे आणि नियमांचे पालन करूनच म्हाडाकडून घर घेता येत. यामध्ये ज्या मंडळात म्हाडाचे घर घ्यायचं आहे त्या मंडळात किंवा परिक्षेत्रात संबंधित व्यक्तीचे आधीच स्वतःचे घर नसावे हा देखील नियम आहे. तसेच म्हाडाचे केवळ एकच घर घेता येते. मात्र, म्हाडाच्या लॉटरीच्या घरांसाठी हा नियम लागू आहे. परंतु प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेअंतर्गत म्हाडाची एकापेक्षा अधिक घरे असतील तरी देखील म्हाडाचे घर मिळवता येते.
विशेष म्हणजे पूर्वीच म्हाडाची घर असेल तरीदेखील या योजनेअंतर्गत घर मिळवता येते. कितीही उत्पन्न असो, कोणत्याही उत्पन्न गटात मोडत असो तरीही या योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना हक्काचे घर उपलब्ध होते. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेसंदर्भात थोडक्यात माहिती घेणार आहोत.
हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेस : आता नागपूरसह संपूर्ण राज्यात ‘ही’ वंदे भारत ट्रेन धावणार; नितीन गडकरीचा मास्टर प्लॅन आला नवीन स्वरूपात
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजना काय आणि योजना सुरू करण्याची गरज नेमकी काय
खरं पाहता अलीकडे मुंबई आणि कोकण मंडळातील म्हाडाच्या घरांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपूर्वी परिस्थिती या उलट होती. म्हाडाच्या घरांसाठी ग्राहक मिळत नव्हते. घर विकली जात नव्हती. परिणामी जी घर विकली जात नाहीत अशा घरांची प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर नव्याने विक्री केली जाते. म्हणजेच अशा घरांच्या सोडतीत जो अर्जदार व्यक्ती प्रथम अर्ज करतो त्याला ते घर लॉटरी बिनाच मिळतं. या योजनेअंतर्गत जेवढ्या घरांसाठी सोडत असेल तेवढ्याच घरांसाठी अर्ज मागवले जातात.
म्हणजेच या योजनेअंतर्गत अर्ज केला म्हणजेच घर हे मिळतच असतं. मात्र आता गेल्या काही वर्षांपासून मुंबई आणि कोकण मंडळात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ही योजना राबवली जात नाही कारण की म्हाडाच्या घर सोडत साठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभतो. पण पुणे नाशिक आणि औरंगाबाद सारख्या मंडळात म्हाडाच्या माध्यमातून घरांची दोनदा तीनदा सोडत काढूनही काही घरे विकली जात नाही. अशा परिस्थितीत या घरांसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ही योजना सुरू केली जाते.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘या’ बँकेत सुरु झाली मोठी पदभरती; ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज, वाचा सविस्तर
एकंदरीत जी घरे म्हाडाच्या घर सोडतील विकली जात नाही ती घरे या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जातात. यामध्ये लॉटरी फक्त नावालाच घेतली जाते अर्ज करणाऱ्या व्यक्तीला त्याच दिवशी घर हे मिळत असं देखील म्हटलं तरी काही हरकत नाही. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, म्हाडाकडून काढण्यात आलेल्या सोडतीत पहिल्यांदा घरी विकली गेली नाही तर दुसऱ्यांदा सोडत निघते. दुसऱ्यांदा विक्री झाली नाही की तिसऱ्यांदा सोडत निघते.
मात्र जर तिसऱ्यांदाही अशा घरांची विक्री झाली नाही तर त्यांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध केल जात. खरं पाहता या योजनेअंतर्गत सोडतीच्या जाहिरातीत नमूद केल्यानुसार निश्चित वेळेत नोंदणी करून सर्वप्रथम अनामत रक्कमेसह अर्ज सादर करेल तो पात्र अर्जदार घरांसाठी थेट विजेता ठरतो. सोडतीच्या दिवशी औपचारिकरित्या याची घोषणा केली जाते. दरम्यान जितकी घरे तितकेच अर्ज स्वीकारले जातात आणि ही घरे विकली जातात. निश्चितच, ज्या लोकांकडे आधीच म्हाडाचे घर आहे अशा लोकांना या योजनेअंतर्गत अजून घर विकत घेता येते.
हे पण वाचा :- Mhada : आनंदाची बातमी ! म्हाडाच्या घरासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय; नागरिकांचा होणार असा फायदा