Mhada Lottery News : मुंबई, कोकण, पुणेसह राज्यातील विविध शहरांमध्ये घरांच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत. यामुळे राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरची गोष्ट बनली आहे. मुंबई बाबत बोलायचं झालं तर येथे घरांच्या किमती सर्वाधिक वाढल्या आहेत.
यामुळे मुंबईसारख्या महानगरांमध्ये घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करू इच्छिणारे सर्वसामान्य नागरिक म्हाडा प्राधिकरणाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान जर तुम्हीही म्हाडाच्या घरांसाठी भविष्यात अर्ज करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताना आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांच्या नियमांमध्ये प्राधिकरणाच्या माध्यमातून थोडासा बदल करण्यात आलेला आहे. यामुळे असंख्य अर्जदारांना दिलासा मिळणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताना आता जुने डोमेसाईल प्रमाणपत्र म्हणजेच 2018 च्या आधीचे डोमिसाईल प्रमाणपत्र तात्पुरते स्वरूपात ग्राह्य धरले जाणार आहे.
परंतु लॉटरीमध्ये विजयी झाल्यानंतर जेव्हा घराचा ताबा दिला जाईल त्याआधी विजेत्या अर्जदाराला नवीन डोमिसाईल प्रमाणपत्र काढून ते सादर करणे आवश्यक राहणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे याची अंमलबजावणी पुढील सोडतीपासून केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे भविष्यात म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या हजारो नागरिकांना या निर्णयाचा फायदा होणे अपेक्षित आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या म्हाडाच्या घरांसाठी जर अर्ज करायचा असेल तर 2018 नंतरचे डोमिसाईल प्रमाणपत्र म्हणजेच ज्या डोमिसाईल प्रमाणपत्रावर बारकोड आहे ते प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाते.
या नव्या डोमीसाईल प्रमाणपत्रावर बारकोड असल्याने प्राधिकरणाला अशा प्रमाणपत्रांची पडताळणी करणे सोपे होते. मात्र हा निर्णय सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरतोय.
दरम्यान हीच बाब विचारात घेऊन आगामी सोडतीपासून अर्ज करताना जुने म्हणजेच 2018 च्या आधीचे म्हणजे ज्यावर बारकोड नाहीये असे डोमेसाईल प्रमाणपत्र देखील तात्पुरते स्वरूपात ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र जेव्हा अर्जदार विजयी होईल आणि त्याला घराचा ताबा दिला जाईल तेव्हा त्याला 2018 नंतरचे डोमिसाईल प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.