Mhada Lottery News : मुंबई महानगर प्रदेशात परवडणाऱ्या दरात घर खरेदी करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. काल म्हाडा कोकण मंडळाकडून तब्बल 4654 घरांसाठीची सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशात ज्या व्यक्तींना घर खरेदी करायची आहे अशा व्यक्तींना परवडणाऱ्या दरात आता घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.
खरं पाहता मुंबई व उपनगरात दिवसेंदिवस घरांच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य लोक कायमच म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची वाट पाहत असतात. अशातच म्हाडाच्या कोकण मंडळांनी 4654 घरांसाठीची सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असल्याने ही सर्वसामान्यांसाठी आनंदाची पर्वणी राहणार आहे.
निश्चितच कोकण मंडळाच्या या घरांची जाहिरात आता प्रसिद्ध झाली आहे, यामुळे आता पुढील प्रक्रिया म्हणजेच अर्ज विक्री आणि स्वीकृती केव्हा सुरू होईल, अनामत रकमेसह केव्हा पर्यंत अर्ज सादर करता येईल, याबाबत अनेकांना जाणून घ्यायचे आहे.
हे पण वाचा :- मुंबई ते गोवा वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट ! ‘या’ मार्गांवर धावणार ट्रेन; ‘हे’ असतील थांबे, पहा डिटेल्स
अशा परिस्थितीत आज आपण म्हाडाच्या कोकण मंडळाच्या या घरसोडीच संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणार आहोत. वास्तविक या घरांसाठीची नोंदणी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याची जाहिरात 6 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
तसेच 8 मार्च रोजी दुपारी बारा वाजल्यापासून म्हणजेच उद्यापासून या घर सोडतीसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू होणार आहे. म्हणजेच आता इच्छुकांना नोंदणी करून आणि आवश्यक ती कागदपत्रे जमवून उद्यापासून बँकेत अर्ज सादर करता येणार आहेत. दरम्यान आम्ही आपणास सांगू इच्छितो की ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन राहणार आहे.
हे पण वाचा :- तरुणांसाठी खुशखबर ! ‘या’ एसटी आगारात विविध पदांसाठी भरती सुरू; 15 मार्चपर्यंत अर्ज करता येणार, इतकं मिळणार वेतन
असं राहील संपूर्ण वेळापत्रक
जाहिरात : 6 मार्च
अर्ज विक्री स्वीकृती : 8 मार्च
अर्ज भरण्याची शेवटची दिनांक :- 12 एप्रिल 2023 पर्यंत अनामत रकमेसह या घर सोडतसाठी अर्ज सादर करता येणार आहेत.
केव्हा काढली जाईल लॉटरी :- याची लॉटरी ही 10 मे 2023 रोजी ठाणे येथील डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी निघणार आहे.
हे पण वाचा :- होळीच्या सणाला ‘या’ बँकेने दिली गोड बातमी; गृहकर्जावरील व्याजदरात केली मोठी कपात, आता घर घेणं होणार सोपं