Mhada Lottery 2023 News : मुंबई, पुणे, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या महानगरात घराचे स्वप्न पूर्ण करणे म्हणजे आता दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे अशी गत झाली आहे. यामुळे सामान्य नागरिक या महानगरात आपल्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यातल्या त्यात मुंबई आणि कोकण मंडळातील घर सोडतीला विशेष प्रतिसाद नागरिकांच्या माध्यमातून मिळत असतो.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! ‘हा’ चर्चित अन अतिमहत्वाचा मेट्रो मार्ग ‘या’ तारखेला होणार सुरु, पहा डिटेल्स
दरम्यान कोकण मंडळाच्या घर सोडतीबाबत आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जसे की आपणास ठाऊकच आहे की, कोकण मंडळात तब्बल 4640 घरे आणि 14 भूखंडांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. कोकण मंडळातील ठाणे शहर आणि जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील घरांचा समावेश या लॉटरीमध्ये आहे. मात्र या लॉटरीला नागरिकांचा अपेक्षित असा प्रतिसाद लाभत नाहीये.
प्रथमच कोकण मंडळातील घर सोडतीला प्रतिसाद मिळत नसल्याने आता या लॉटरी संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या घर सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे. अर्ज पाठवण्याची मुदत आता 19 एप्रिल 2023 पर्यंत वाढवण्यात आली असून 21 एप्रिल पर्यंत अनामत रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांना मुदतीत वाढ दिल्यामुळे या लॉटरीला नागरिकांचा प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; वर्सोवा विरार सीलिंक आता ‘या’ शहरापर्यंत वाढवला जाणार, पहा संपूर्ण डिटेल्स
आतापर्यंत किती अर्ज आलेत?
हाती आलेल्या एका बहुमूल्य माहितीनुसार, आतापर्यंत कोकण मंडळातील या चार हजार 640 घरांच्या आणि 14 भूकंडांच्या सोडतीसाठी 29 हजार 330 लोकांनी अर्ज पाठवले आहेत. यामध्ये अठरा हजार पन्नास लोकांनी अनामत रकमेसह आपला अर्ज सादर केला आहे.
वास्तविक गेल्या काही वर्षांपासून कोकण आणि मुंबई मंडळाच्या लॉटरीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावेळी मात्र तसा प्रतिसाद पाहायला मिळाला नाही. यामुळे कोकण मंडळाअंतर्गत काढण्यात आलेल्या या लॉटरीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.
केव्हा निघणार लॉटरी?
कोकण मंडळांतर्गत ही लॉटरी 10 मे 2023 रोजी ठाणे येथील डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सकाळी दहा वाजता काढली जाणार आहे.