Mhada Lottery 2023 : मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नासिक यांसारख्या महानगरात म्हाडाच्या माध्यमातून घरांची सोडत काढली जाते. वास्तविक या महानगरात घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आतवाक्याबाहेर आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांकडून कायमच म्हाडाच्या घरांना पसंती दर्शवली जाते.
ही घरे नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध असल्याने म्हाडाच्या घर सोडतिला मोठा प्रतिसाद लाभत असतो. गेल्या दीड वर्षांपासून नागरिकांकडून मुंबई आणि कोकण मंडळाच्या घर सोडतीची वाट पाहिली जात होती. दरम्यान आता कोकण मंडळाकडून घर सोडत काढण्यात आली आहे.
यासाठी नोंदणी प्रक्रिया 08 मार्च रोजी पासून सुरू झाली आहे. मुंबई मंडळातील घर सोडत बाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला याबाबत मुंबई मंडळाकडून घोषणा होऊ शकते असं सांगितलं जात आहे.
सध्या मात्र कोकण मंडळाची नोंदणी प्रक्रिया सुरू असून अनामत रक्कम देखील इच्छुकांकडून भरले जात आहे. कोकण मंडळांने आपल्या 4640 घरांसाठी ही सोडत काढली आहे. यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील घरांचा समावेश आहे. या भागातील घरांसाठी जारी करण्यात आलेल्या या सोडतीमध्ये 5325 लोकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये 2449 लोकांनी आतापर्यंत अनामत रक्कम म्हणजेच डिपॉझिटची रक्कम भरली आहे.
अशा परिस्थितीत इच्छुक लोकांनी या सोडतीसाठी 10 एप्रिल पर्यंत नोंदणी करायचे आहे आणि 12 एप्रिल पर्यंत अनामत रकम भरण्याची मुभा या लोकांना देण्यात आली आहे. अनामत रक्कम पूर्वीप्रमाणेच आरटीजीएस किंवा एन इ एफ टी च्या माध्यमातून जमा करावयाची आहे. दरम्यान या सोडतीसाठी इच्छुक नागरिकांना दोन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.
म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच अधिकृत एप्लीकेशन च्या माध्यमातून यासाठी नोंदणी करता येणार आहे. म्हाडाने विकसित केलेले एप्लीकेशन इंटिग्रेटेड हाऊसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टम IHLMS 2.0 याद्वारे नागरिकांना नोंदणी करता येणार आहे. हे एप्लीकेशन अँड्रॉइड तसेच एप्पल यूजर साठी उपलब्ध आहे. यासोबतच म्हाडाची अधिकृत साईट https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुकांना नोंदणी करता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या सोडत प्रक्रिया अंतर्गत चार मे रोजी अंतिम यादी अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध होणार आहे. यानंतर 10 मे रोजी ठाणे येथील डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी लॉटरी काढली जाणार आहे.
खरं पाहता कोकण आणि मुंबई मंडळाच्या घर सोडतीला कायमच मोठा प्रतिसाद लागला आहे. यादेखील लॉटरी ला चांगला प्रतिसाद लाभेल असं म्हाडा कडून सांगितलं जात आहे. इच्छुक व्यक्तींना लवकरात लवकर या घर सोडतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन देखील केले जात आहे.
हे पण वाचा :- आता राजधानी मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणार वंदे भारत ट्रेन ?