Mhada House Lottery : अलीकडे मुंबई, नवी मुंबई सारख्या महानगरांमध्ये तथा मुंबई महानगर क्षेत्रात घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. या शहरांमधील घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. यामुळे अनेक जण म्हाडा आणि सिडकोच्या घरांच्या आतुरतेने वाट पाहतात.
म्हाडा आणि सिडकोच्या घरांचा किमती देखील सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या असल्याने यांच्या लॉटरी कडे सर्वसामान्य नागरिकांचे नेहमीच लक्ष असते. अशातच आता म्हाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
जस की, आपणास ठाऊकच आहे की, म्हाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार झालेल्या विरार बोळींज येथील गृहप्रकल्पातील जवळपास 5000 हून अधिक घरे विक्री विना पडून आहेत.
दरम्यान आता या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाकडून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत आता येत्या दहा तारखेला येणाऱ्या अक्षय तृतीया सरांचे औचित्य साधून प्राधिकरणाकडून सोशल मीडियावर यासाठी विशेष कॅम्पेन चालवले जाणार आहे.
खरे तर या घरांसाठी आतापर्यंत कित्येकदा सोडत काढली गेली आहे. मात्र वारंवार सोडत काढूनही या घरांची विक्री झालेली नाही. अजूनही हजारो घरे विक्री विना पडून असून प्राधिकरणाने विक्री अभावी बाकी राहिलेली घरे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेअंतर्गत विक्री करण्याला सुरुवात केली आहे.
खरंतर गृहप्रकल्प जिथे आहे तिथे अजूनही उत्तम कनेक्टिव्हिटी पाहायला मिळत नाही. शिवाय या ठिकाणी पाण्याचा देखील प्रश्न असल्याची तक्रार आहे. सूर्या प्रकल्पाचे पाणी या भागाला पोहोचले आहे.
पण तरीही नागरिकांनी या घरांना अपेक्षित असा प्रतिसाद दिलेला नाही. दुसरीकडे प्राधिकरणाला या घराच्या मेंटेनन्स साठी आणि सुरक्षेसाठी अधिकचा खर्च आता करावा लागत आहे.
दरम्यान या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने नुकताच धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. या अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेअंतर्गत नागरिकांना घरी उपलब्ध करून दिली जात असून अवघ्या दोन आठवड्यात घरांचा ताबा दिला जात आहे.
विशेष म्हणजे ज्या सहकारी किंवा खाजगी संस्था या प्रकल्पातील 100 किंवा त्याहून अधिक घरे एक गठ्ठा खरेदी करतील त्यांना पंधरा टक्के सवलत देण्याचा देखील निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे.
यामुळे आता म्हाडा प्राधिकरणाच्या या धोरणात्मक निर्णयामुळे या घरांची विक्री होणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. तथापि प्राधिकरणाच्या माध्यमातून या निर्णयामुळे विक्री अभावी पडून असलेल्या घरांची विक्री होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.