Mhada : मुंबई पुणे यांसारख्या महानगरात सर्वसामान्य लोक प्रामुख्याने म्हाडा व सिडकोकडून विकसित करण्यात आलेल्या घरात वास्तव्य करतात. दरम्यान म्हाडाच्या घरासंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे हजारो कुटुंबाचा फायदा होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार आता म्हाडाच्या तीस वर्ष जुन्या इमारतीचा पुनर्विकास केला जाणार आहे. शिंदे यांच्या या निर्णयामुळे 50 ते 60 हजार सर्वसामान्य कुटुंबांना फायदा होणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केल आहे. तीस वर्ष जुन्या जवळपास 500 इमारतींचा या निर्णयामुळे पुनर्विकास करता येणे शक्य होणार आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्रातील गरीब कुटुंबाला 100 रुपयात रवा, डाळ, साखर, तेल आनंदाचा शिधा मिळणार; पण नेमका लाभ कुणाला? वाचा सविस्तर
मुख्यमंत्री महोदय यांनी घेतलेला हा निर्णय म्हाडा संघर्ष कृती समिती आणि भारतीय जनता पार्टी म्हाडा सेलच्या एका बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीमध्ये 33(24) या खंडामध्ये सुधारण करू 33(7) चे सर्व फायदे लागू करून या तीस वर्षे जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी मान्यता देण्यात आली असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे.
वास्तविक पाहता महाडा कडून जुन्या इमारतींचा पुनर्विकास केला जातो. त्यासाठी मात्र काही नियम लावून देण्यात आले आहेत. म्हाडाने मुंबईमध्ये जवळपास 14 हजार जुन्या आणि मोडकळी झालेल्या इमारतींचा नव्याने पुनर्विकास करून दाखवला आहे.
हे पण वाचा :- Mhada News : मोठी बातमी ! म्हाडाच्या घरासाठीच्या अनामत रक्कमेत मोठी वाढ; आता भरावी लागणार ‘इतकी’ रक्कम
मात्र यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांमुळे तीस वर्ष जुन्या अशा शहरातील एकूण 500 इमारतींचा पुनर्विकास करताना अडथळे येत होते. जाणकार लोकांच्या मते या इमारतींचे चटई क्षेत्र अर्थातच कार्पेट एरिया कमी असल्याने विकासक या जमिनीच्या पुनर्विकासासाठी पुढे येत नव्हते.
यामुळे विकास नियंत्रक नियमावलीत सुधारणा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून आता मुंबईमधील या तीस वर्ष जुन्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. निश्चितच, मुख्यमंत्री महोदय यांच्या या निर्णयामुळे पन्नास ते साठ हजार सामान्य कुटुंबाचा फायदा होणार आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग : तलाठी भरतीच नियोजन ठरलं ! ‘त्या’ जिल्ह्यात भरली जाणार ‘इतकी’ पदे; ‘या’ तारखेला सुरू होणार अर्ज प्रक्रिया