Medicinal Plant Farming: भारतात शेती व्यवसायात (Farming) मोठा आमूलाग्र बदल केला जात आहे. भारतातील शेतकरी बांधव (Farmer) आता नवीन औषधी वनस्पतींची (Medicinal Plant) शेती करत असल्याचे चित्र आहे.
औषधी वनस्पतींची लागवड शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याचे ठरत असल्याने शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची शेती करत असल्याचे राज्यात बघायला मिळत आहे. मित्रांनो सोनामुखी ही देखील एक प्रमुख औषधी वनस्पती आहे.
सोनामुखी (Sonamukhi Farming) ही एक बहु-वर्षीय काटेरी झुडूप सारखी, औषधी वनस्पती आहे जी Leguminaceae (Pulse) कुटुंबात येते. पूर्णपणे ओसाड जमिनीत वाढू शकणार्या या वनस्पतीला जास्त पाणी आणि खताची गरज नसते. अशा प्रकारे, भारतातील ओसाड जमिनीच्या भागात सोनमुखीची लागवड करून भरीव नफा मिळवता येतो.
सोनमुखी ही एक औषधी वनस्पती आहे जी एकदा लावली तर 4-5 वर्षे उत्पादन मिळते. या वनस्पतीमध्ये 4 अंश ते 50 अंश सेल्सिअस तापमान सहन करण्याची क्षमता आहे. एकदा लागवड केल्यावर या पिकाच्या झाडांना कोणत्याही पशू किंवा पक्ष्याकडून इजा होत नाही किंवा कीटकांचाही जास्त प्रादुर्भाव होत नाही. शेंगायुक्त वनस्पती असल्याने जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत होते.
त्याची पाने आणि शेंगा विदेशात निर्यात करून परकीय चलन मिळवले जाते. सोनामुखीची लागवड प्रामुख्याने भारतात केली जाते. देशात विशेषतः राजस्थान, तामिळनाडू, गुजरातमध्ये सोनमुखीचे उत्पादन होते. आपल्या राज्यात सोनामुखीची व्यवसायिक लागवड बघायला मिळत नाही. मात्र प्रायोगिक तत्त्वावर काही शेतकऱ्यांनी लागवड केलेली असेल.
सोनामुखी शेतीसाठी हवामान आणि माती: सोनामुखी हे कोरडे हवामान आणि कमी पावसाच्या प्रदेशासाठी (30-40 सेमी) योग्य आहे. वालुकामय चिकणमाती असलेली शेतजमीन तसेच मातीचा pH मूल्य 7.0-8.5 च्या दरम्यान असलेली शेतजमीन याच्याशेती साठी योग्य आहे.
सोनामुखी जाती:
एएचएफटी : गुजरातमध्ये या जातीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. हे विशेषतः पानांसाठी घेतले जाते.
सोना: उत्तर भारतातील मैदानी भागात लागवडीसाठी या जातीची शिफारस केली जाते. सोनसाईड हे 3.51 टक्के पर्यंत पानांमध्ये आढळते.
कापणी: सोनमुखीच्या पेरणीनंतर सुमारे 100-120 दिवसांनी त्याची पाने कापण्यासाठी तयार होतात. झाडांची काढणी जमिनीपासून तीन इंच वरती धारदार विळ्याने करावी जेणेकरून पाने सहज परत येतील, या पिकाची पुढील काढणी पहिल्या कापणीपासून 60 ते 75 दिवसांच्या अंतराने करावी.
उत्पन्न: पावसावर अवलंबून असलेल्या भागात या पिकापासून सुमारे 400 ते 600 किलो कोरडी पाने तयार होतात. पर्जन्यमान आणि ओलिताच्या स्थितीत अनुक्रमे 4 क्विंटल आणि 8 क्विंटल प्रति हेक्टर बियाणे उत्पादन उपलब्ध होते.