Medicinal Plant Farming: संपूर्ण जगात औषधी वनस्पतींची (Medicinal crop) वाढती मागणी लक्षात घेता आपल्या देशात औषधी वनस्पतींची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे मायबाप सरकारही आपल्या स्तरावर औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी सातत्याने प्रोत्साहन देत आहे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ही पिके शेतकऱ्यांना (Farmer) कमी संसाधने आणि कमी मेहनतीत दुप्पट नफा (farmer income) देतात. अकरकरा (Akarkara crop) ही अशीच एक औषधी वनस्पती आहे.
या पिकाची मुळे औषधी बनवण्यासाठी वापरली जातात. आयुर्वेदात पक्षाघात झालेल्या रुग्णांना अकरकरा बियांचे मधासोबत सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या पिकाची भुसभुशीत आणि नरम जमिनीवर लागवड करणे खूप फायदेशीर ठरत आहे. लक्षात ठेवा की, ज्या शेतात अकरकरा लागवड (Akarkara farming) केली जाते, तेथे पाण्याचा निचरा करण्याची पुरेशी व्यवस्था असावी. पाणी साचल्यास झाडाचे मोठे नुकसान होऊ शकते.
अकरकरा लागवडीसाठी किती तापमान आवश्यक आहे बर…!
या वनस्पतीची लागवड उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकरी बांधव या पिकाच्या शेतीतून चांगली कमाई करत आहेत. जाणकार लोकांच्या मते, हिवाळा तसेच उन्हाळा याचा फारसा परिणाम त्याच्या लागवडीवर होत नाही. तज्ञांच्या मते, त्याच्या रोपाच्या उगवणासाठी 25 अंशांपर्यंत तापमान आवश्यक आहे. त्याच वेळी, 15 ते 30 अंश तापमान रोपाच्या चांगल्या वाढीसाठी योग्य आहे.
कशी केली जाते बर अकरकरा लागवड..!
शेतकरी बांधव अकरकरा या औषधी वनस्पतीची लागवड रोपे आणि बियांच्या माध्यमातून करू शकता. बियाणे स्वरूपात लागवड करायची असेल तर एकरी तीन किलो बियाणे लागते आणि रोपाच्या स्वरूपात करायची असेल तर दोन किलो बियाणेच चालेल.
ही रोपे लावणीनंतर 6 महिन्यांत काढण्यासाठी तयार होतात. जेव्हा त्याची पाने पिवळी पडतात तेव्हा ती मुळापासून उपटून टाकावीत. या दरम्यान मुळे कापून झाडापासून वेगळी करावीत. याच्या लागवडीमध्ये दीड ते दोन क्विंटल बियाणे आणि 8 ते 10 क्विंटल मुळे प्रति एकर मिळत असल्याचा दावा केला जातो.
किती कमाई होते या पिकाच्या शेतीतुन
एका एकरात उत्पादित झालेल्या अकरकराच्या मुळांची बाजारात किंमत 20 हजार रुपयच्या आसपास असते. त्याच वेळी, त्याचे बियाणे 10 हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकले जाते. शेतकऱ्याने एका एकरात 40 ते 50 हजार रुपये टाकून या रोपाची लागवड केली तरी त्याला 2 ते 3 लाखांचा नफा सहज मिळू शकतो. अशा परिस्थितीत जर शेतकरी बांधवांनी पाच एकरात या पिकाची शेती केली तर त्यांना पंधरा लाखांचा निव्वळ नफा राहणार आहे.