Medicinal Plant Farming : पारंपरिक पिकांच्या शेतीतून शेतकर्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न (farmer income) मिळत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना (farmer) काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करत औषधी पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात आहे.
जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना औषधे पिकांच्या शेतीचा (farming) सल्ला देत आहेत. उत्तर प्रदेश राज्यातील सीतापुर जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याने देखील पारंपरिक पिकाच्या शेतीत सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने औषधी वनस्पतीची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे औषधी वनस्पतीच्या शेतीतून या प्रयोगशील शेतकऱ्याला (progressive farmer) आता लाखो रुपयांची कमाई होत आहे. यामुळे सध्या पंचक्रोशीत या शेतकऱ्याची चर्चा रंगली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या अवलिया शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशोक गुप्ता या प्रयोगशील शेतकऱ्याला त्यांच्या एका मित्राने औषधी वनस्पतीच्या शेतीचा सल्ला दिला होता आणि आजच्या घडीला त्याच्या मित्राचा सल्ला त्याच्यासाठी बहू कामाचा ठरला आहे.
अशोक गुप्ता यांच्या मते पूर्वी ते ऊस गहू यांसारख्या पारंपरिक पिकांची शेती करत असत मात्र पारंपरिक शेतीत रासायनिक खतांचा अधिक वापर करावा लागत असल्याने उत्पादन खर्चात वाढ होत होती. अशा परिस्थितीत उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती झाली होती. शिवाय त्यांच्या शेतात रानटी जनावरांचा देखील मोठा फरक होता. अशा परिस्थितीत त्यांनी पीकपद्धतीत बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला.
अशोक गुप्ता, सीतापूर बिस्वान ब्लॉकचे गाव कमुवाल या ठिकाणी राहतात. अशोक गुप्ता यांनी सांगितल्याप्रमाणे, औषधी पिकांची शेती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर. 2017 मध्ये, कृषी विज्ञान केंद्र कटियाच्या संपर्कात आल्यानंतर, त्यांना CIMAP लखनऊ येथून प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर एक एकर जमिनीवर ब्राम्ही बाकोपाची लागवड सुरू केली. आज ते एका एकरातून वर्षाला 2 ते 3 लाख रुपये सहज कमावत आहेत. याशिवाय जिल्ह्यातील इतर लोकांना औषधी शेतीबाबत प्रबोधन करण्यात येत आहे.
एकदा लागवड वर्षातून तीन वेळा काढणी
अशोक गुप्ता म्हणतात की बाकोपा ब्राम्हीची लागवड खूप फायदेशीर आहे. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे प्राणी ते खात नाहीत. दुसरीकडे एका एकरासाठी केवळ 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. या पिकाची एकदा लागवड केल्यानंतर वर्षातून तीनदा काढणी करता येते. याशिवाय मका, तूर ही सहपीक म्हणून पेरता येते.
शेतीतील खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीची देशी पद्धत अवलंबली
रासायनिक शेतीमुळे जमीन नापीक होत असल्याचे अशोक गुप्ता सांगतात. दिवसेंदिवस उत्पादन कमी होऊन खर्च वाढत होता. वाढता खर्च कमी करण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी ते स्वत: शेण आणि गोमूत्रापासून जीवामृत, घंजीवामृत आणि कीटकनाशक औषधं आजूबाजूच्या वनस्पतींपासून स्वतःच्या घरी तयार करतात आणि त्यांचा शेतीत वापर करतात. यामुळे शेतीमधला खर्च 75 टक्क्यांनी कमी होत असल्याचा दावा अशोक यांनी केला आहे.
करारावर जमीन घेऊन केली औषधी शेती
नैसर्गिकरित्या उत्पादित केलेल्या औषधी पिकांच्या उत्पादन पाहून अशोक गुप्ता गदगद झाले आणि अशोक गुप्ता यांनी सध्या 4 एकर जमीन भाड्याने घेऊन ड्रॅगन फ्रूट, अकरकरा, कॅमोमाईल, तुळशी, अश्वगंधा, हिबिस्कसची लागवड सुरू केली असून, त्यातून त्यांना वर्षाला 7 ते 8 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.
बाजारपेठेबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या नैसर्गिक उत्पादनामुळे खरेदीदार त्यांच्या शेतातूनच पीक घेण्यास तयार आहेत. अशोक यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी जेव्हा आपण रासायनिक खते, कीटकनाशके वापरून पिके घ्यायचो, तेव्हा बाजारपेठ आपल्यालाच शोधावी लागत होती, परंतु नैसर्गिक शेतीमुळे लोक पीक घेण्यासाठी शेतात पोहोचतात.