Mansoon News : मान्सून 2024 चा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दिल्लीत सततच्या मुसळधार पावसानंतर, दक्षिण-पश्चिम मान्सूनने 2 ऑक्टोबरला अधिकृतपणे निरोप घेतला आहे. महाराष्ट्रात देखील परतीचा पाऊस सुरू झाला असून 5 ऑक्टोबरला सुरू झालेला परतीचा पाऊस आता 10-15 ऑक्टोबर दरम्यान विश्रांती घेणार आहे.
मान्सूनने महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातून माघार घेतली आहे. तो आता लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेणार आहे. खरेतर, दरवर्षी 25 सप्टेंबरच्या सुमारास मान्सून दिल्लीहून निघून जातो, मात्र यावेळी मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला आहे.
पण, येत्या 3-4 दिवसांत मान्सून उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतून निघून जाणार, असा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातुन पुढील 3-4 दिवसांत मान्सून निघून जाऊ शकतो.
IMD नुसार, मान्सून माघारीचा अक्ष मध्य नेपाळमधून नौतनवा, उत्तर प्रदेशातील सुलतानपूर, मध्य प्रदेशातील पन्ना, नर्मदापुरम, खरगोन, महाराष्ट्रातील नंदुरबार आणि गुजरातमधील नवसारी मार्गे अरबी समुद्राकडे जात आहे.
महाराष्ट्रातून 10 ऑक्टोबर पर्यंत मान्सून माघार घेणार असे चित्र आहे. मात्र जर परतीच्या पावसाचा प्रवास कोळंबला तर 15 ऑक्टोबर पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रातून हद्द बाहेर होणार आहे. मात्र तत्पूर्वी देशातील काही राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोणत्या राज्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस?
स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने पुढील २४ तासांत केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. ईशान्य भारत आणि उप-प्रदेशांमध्ये एक किंवा दोन जोरदार सरीसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
यासोबतच दक्षिण आतील कर्नाटक, केरळ, माहे, तामिळनाडूमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. लक्षद्वीपवर चक्रीवादळ तयार झाले आहे. यामुळे, पुढील 3 दिवसात एक कमी दाब तयार होऊ शकतो जो मजबूत होईल आणि एक डिप्रेशन तयार होणार आहे.
यामुळे आता मान्सून गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून निरोप घेऊ शकतो. केरळमध्ये 11 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे.
यामुळे केरळमधील काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर लक्षद्वीप, तामिळनाडू, आसाम, मेघालय आणि कर्नाटकमध्ये जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज ईशान्य भारत, केरळ आणि तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण, त्यानंतर पाऊस कमी होईल. दरम्यान, पुढील 24 तासांत केरळ आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारत आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये एक किंवा दोन जोरदार सरींसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
त्याचवेळी बिहार, झारखंड, ओडिशा, गंगेचे पश्चिम बंगाल, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, किनारी कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर आणि मध्य प्रदेशात हलक्या पावसाची शक्यता आहे.