Mankhurd To Thane Flyover Will Start : आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्यात सध्या वेगवेगळी विकासाची कामे सुरु आहेत. वेगवेगळे प्रकल्प जलद गतीने सामान्य जनतेच्या सेवेत आणले जात आहेत.
विकासाची कामे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. राजधानी मुंबईत आणि उपनगरातं देखील वेगवेगळी रस्ते विकासाची कामे शासनाच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहेत.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला आता ‘या’ ठिकाणी मिळणार थांबा; केंद्रीय मंत्र्यांची माहिती
यामध्ये मानखुर्द ते ठाण्याचा प्रवास सुखकर करण्यासाठी छडानगर जंक्शनवर मानखुर्द ते ठाणे दरम्यान उड्डाणपूल विकसित केला जात आहे. आता या उड्डाणपूला बाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. वास्तविक हा उड्डाणपूल गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यातच पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन होते. मात्र आता एप्रिल अखेर हा पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असं सांगितलं जात आहे.
याबाबत एम एम आर डी ए चे आयुक्त एस व्ही आर श्रीनिवासन यांनी दिलेल्या माहितीनुसार हा पूल सुरू करण्यासाठी आणखी दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या त्या ठिकाणी सर्विस रोड तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे दीड ते दोन आठवडे अजून लागणार आहेत.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा मुहूर्त बदलला, आता ‘या’ महिन्यात होणार उद्घाटन, पहा…..
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की चला नगर जंक्शन वाहतूक सुधार प्रकल्पांतर्गत विकसित केल्या जाणाऱ्या तीन उड्डाणंपुलामध्ये या उड्डाणंपुलाचा देखील समावेश आहे. याचे काम एम एम आर डी ए च्या माध्यमातून केले जात आहे. मानखुर्द ते ठाणे उड्डाणंपुलाची लांबी 1235 मीटर असून रुंदी 8.5 मीटर आहे तसेच हा 2-लेनचा उड्डाणपूल आहे.
या उड्डाणंपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचा जवळपास 20 ते 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. वेळेत तर बचत होणारच आहे शिवाय इंधनाची बचतही यामुळे होणं शक्य होणार आहे. प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवास यामुळे करता येणार आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी खुशखबर ; ‘या’ बहुचर्चित पुलाचे ‘या’ तारखेला होणार उदघाट्न, पहा डिटेल्स