Maka Lagwad 2024 : मका हे खरीप हंगामात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या तृणधान्य पिकाची आपल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. गेल्या वर्षी कमी पाऊस झालेला होता तरी देखील मका हे तृणधान्य पीक राज्यात मोठ्या प्रमाणात उत्पादित करण्यात आले होते. यंदा तर मान्सून काळात चांगला पाऊस पडणार असा अंदाज अनेक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी व्यक्त केला आहे.
त्यामुळे यावर्षी मका लागवडीखालील क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत काहीसे वाढण्याची शक्यता आहे. मका लागवडीखालील क्षेत्र वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे गेल्या वर्षी उत्पादित झालेल्या मक्याला चांगला दरही मिळाला आहे.
पोल्ट्री उद्योगात आणि इथेनॉल निर्मितीसाठी मक्याची मागणी वाढत असल्याने आगामी काळात ही बाजारभाव असेच चढे राहू शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे याही वर्षी मक्याची लागवड वाढणार आहे.
जर तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात मका लागवड करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण मक्याच्या 70 ते 80 दिवसात काढण्यासाठी तयार होणाऱ्या काही सुधारित जातींची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
विवेक संकरीत मका-२१ : मक्याची ही एक संकरित जात आहे. कमी दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होणारी जात आहे. या जातीचा मका हा पिवळा असतो. म्हणजे या जातीचे दाणे पिवळे असतात. या जातीची महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आली आहे.
राज्यातील हवामान या जातीसाठी विशेष अनुकूल असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. या जातीचे पीक कमी दिवसात म्हणजे 70 ते 80 दिवसात काढण्यासाठी तयार होते. 70 ते 80 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होते मात्र उत्पादन खूपच चांगले मिळते.
या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 45 ते 50 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते असा दावा काही कृषी शास्त्रज्ञांनी यावेळी केला आहे. निश्चितच खरीप हंगामात मका लागवड करायचा प्लॅन असेल तर या जातीचे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
पुसा संकर मका 1 : मक्याची ही एक अल्पकालावधीत म्हणजेच 70 ते 80 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होणारी संकरित जात म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. या जातीची आपल्या महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आली आहे.
या जातीची खरीप हंगामात लागवड करता येते. नारंगी पिवळा दाणा असणारी मक्याची ही जात राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित होत असून या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादनही मिळत आहे.
कमी दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होत असतानाही या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 40 ते 50 क्विंटल धान्याचे उत्पादन मिळत असल्याचा दावा काही तज्ञांनी केला आहे. ज्यांना कमी दिवसात मक्याच्या पिकातून उत्पादन मिळवायचे असेल त्यांच्यासाठी या जातीचे पीक फायदेशीर ठरणार आहे.