Maize Rate : मका हे खरीप हंगामात उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. मक्याचा वापर पोल्ट्री उद्योगात मोठ्या प्रमाणात केला जातो. याशिवाय फूड इंडस्ट्री मध्ये देखील मक्याचा वापर होतो. बाजारात मधु मक्याला देखील मोठी मागणी असते. अलीकडे तर मक्यापासून इथेनॉलची निर्मिती देखील होऊ लागली आहे.
यामुळे मक्याला गेल्या काही वर्षांपासून बाजारात चांगला समाधानकारक भाव मिळत आहे. यंदा तर खरीप हंगामात कमी पावसामुळे मक्याच्या उत्पादनात मोठी घट आली आहे.
अनेक ठिकाणी कमी पावसामुळे मक्याची लागवड झालेली नाही. महाराष्ट्रातील मका लागवडीखालील क्षेत्र यंदा खूपच कमी झाले आहे. आपल्या राज्यासारखेच परिस्थिती देशातील इतरही अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळाली आहे.
त्यामुळे उत्पादन कमी झाले असून मक्याच्या बाजारभावात चांगली वाढ होत आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे. केंद्र शासनाने 2023-24 या वर्षासाठी मका करिता 2090 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे.
सध्या स्थितीला मात्र देशातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये मक्याला हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळत आहे. बाजार समित्यांमध्ये मक्याचे भाव 20 टक्क्यांनी वाढले असून यामुळे शेतकऱ्यांना यंदा चांगले उत्पन्न मिळणार अशी आशा आहे.
पोल्ट्री उद्योग, इथेनॉल उद्योग यामध्ये आता मक्याचा वापर वाढला असल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. आता आपण राज्यातील सर्वच बाजार समित्यांमधील मक्याचे बाजारभाव थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रातील बाजारात मक्याला काय भाव मिळतोय
अहमदनगर – 2700 रुपये प्रतिक्विंटल
चाळीसगाव – 2200 रुपये प्रति क्विंटल
देवळा – 2200 रुपये प्रति क्विंटल
दोंडाईचा- 2240 रुपये प्रति क्विंटल
कुरडवाडी – 2250 रुपये प्रति क्विंटल
लासलगाव (निफाड) – 2325 रुपये प्रति क्विंटल
लासलगाव (विंचूर) – 2230 रुपये प्रति क्विंटल
पुणे मंडी – 2500 रुपये प्रति क्विंटल
सटाणा – 2230 रुपये प्रति क्विंटल
शहादा – 2921 रुपये प्रति क्विंटल