Maize Rate : मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मक्याचे बाजार भाव तेजीत आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार गेल्या दोन आठवड्यातच मक्याच्या बाजारभावात 20 टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे.
यामुळे मका उत्पादकांना दिलासा मिळत असून आगामी काळात मक्याचे बाजार भाव कसे राहणार हा देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे.
दरम्यान बाजार अभ्यासकांनी या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे. खरे तर गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात खूपच कमी पाऊस झाला.
याचा परिणाम म्हणून ऊस लागवड मोठ्या प्रमाणात पिछाडली. ऊस लागवडीवर कमी पावसाचा परिणाम पाहायला मिळाला शिवाय ज्या ठिकाणी ऊस लागवड झाली तिथे देखील अपेक्षित असे उत्पादन मिळाले नाही.
त्यामुळे शासनाने साखरेची उपलब्धता व्हावी यासाठी इथॅनॉल निर्मितीबाबतचे आपले धोरण काहीसे बदलले आहे. इथेनॉल निर्मितीसाठी आता अधिक प्रमाणात मका वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.
म्हणजेच उसाचा वापर हा इथेनॉल निर्मितीमध्ये कमी ठेवण्याचा निर्णय झालेला आहे. या निर्णयामुळे मात्र मका उत्पादकांना मोठा दिलासा मिळत असून बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
दुसरीकडे तेल विपणन कंपन्यांनी मका आणि इतर धान्यांपासून तयार झालेल्या इथेनॉल ची किंमत पाच रुपयांहून अधिकने वाढवली आहे. त्याचा परिणाम म्हणून पोल्ट्री उद्योगात सध्या मक्याचा शॉर्टेज पाहायला मिळत आहे.
यामुळे सध्या बाजारभावात तेजी आली असून आगामी काळात देखील बाजारभाव चढेच राहणार असे पोल्ट्री उद्योगातील जाणकार लोकांनी सांगितले आहे.
इथेनॉल साठी आणि पोल्ट्री उद्योगात मक्याची मागणी वाढत असल्याने आणि सध्या स्थितीला पोल्ट्री उद्योगात मोठ्या प्रमाणात मक्याचा शॉर्टेज पाहायला मिळत असल्याने आगामी काळात सुद्धा बाजार भाव असेच तेजीत राहतील असे मत काही जाणकारांच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहे.