Maize Farming : मका हे भारतात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. विशेष म्हणजे मक्याला आता बाजारात चांगला दरही मिळतोय. जेव्हापासून इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा वापर होऊ लागला आहे तेव्हापासून याचे बाजार भाव वाढले आहेत. इथेनॉल निर्मिती सोबतच मक्याचा पोल्ट्री उद्योगात देखील मोठ्या प्रमाणात वापर होतो. मक्याची लागवड ही खरीप हंगामात सर्वाधिक केली जाते.
या पिकातून जर चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातींची पेरणी करणे आवश्यक असते. देशातील कृषी शास्त्रज्ञांनी मक्याच्या वेगवेगळ्या जाती विकसित केल्या आहेत. दरम्यान आज आपण मक्याचा अशाचं 4 जातींची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळवतां येते.
या आहेत मक्याच्या टॉप 5 जाती
X 1174 WV : ही मक्याची एक सुधारित आणि मध्यम कालावधीत म्हणजे साधारणतः 80 ते 85 दिवसात परिपक्व होणारी जात आहे. मक्याच्या या जातीचे दाणे पिवळ्या केशरी रंगाचे असतात. या जातीच्या मक्यापासून एकरी २५ ते ३५ क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे. ही जात बागायती क्षेत्रासाठी योग्य असल्याचे आढळून आले आहे. या जातीची लागवड संपूर्ण भारतभर केली जाऊ शकते.
प्रकाश जे.एच. 3189 : या जातीची लागवड कुठेही करता येते. म्हणजेच आपल्या राज्यातही या जातीची लागवड करता येऊ शकते. ही एक संकरित जात आहे. मक्याची ही जात लवकर परिपक्व होते. अवघ्या 80 ते 85 दिवसात मक्याचा हा वाण परिपक्व होत असून यापासून शेतकऱ्यांना एकरी 25 ते 30 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. बागायती आणि कोरडवाहू अशा दोन्ही भागात या जातीची लागवड करता येणे शक्य आहे. कोरडवाहू भागात लागवड केली तरीदेखील यापासून चांगले उत्पादन मिळते.
पार्वती : वर सांगितलेल्या दोन्ही जातींच्या तुलनेत या जातीचे पीक थोडे उशिराने परिपक्व होते. साधारणता 110 ते 115 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते. या जातीची मक्याची झाडे मध्यम उंचीची असतात. एकां मक्याला दोन कणीस लागतात. या मक्याचे दाणे केशरी-पिवळ्या रंगाचे व कडक असतात. या जातीपासून एकरी 14 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते.
शक्ती 1 : ही जात सुद्धा लवकर काढणीसाठी तयार होते. पेरणी केल्यानंतर साधारणतः 90 ते 95 दिवसांनी या जातीचे पीक हार्वेस्टिंग साठी रेडी होते. या जातीपासून शेतकऱ्यांना एकरी 50 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे. या जातीच्या मक्याचे दाणे केशरी पांढऱ्या रंगाचे असतात. संपूर्ण भारतात या जातीच्या मक्याचे लागवड करता येणे शक्य असल्याचा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे.