Maize Farming : मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. मका हे खरीप हंगामात आणि उन्हाळी हंगामात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. खरीप हंगामात मक्याची जून आणि जुलै महिन्यात पेरणी केले जात असते.
दुसरीकडे उन्हाळी हंगामात मक्याची पेरणी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात केली जाते. मात्र मक्याची लागवड ही खरीप हंगामातच सर्वाधिक होते. तथापि, काही शेतकरी चारा उत्पादनासाठी उन्हाळी हंगामात मक्याची लागवड करतात.
दरम्यान आज आपण उन्हाळी मका पिकातून विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर आज आपण कोणत्या खताचा वापर केला पाहिजे, मका पिकाला पहिले खत कोणते दिले गेले पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मक्याला पहिले खत कधी द्यावे बरं ?
कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळी हंगामातून मका पिकाचे दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर पिकाला 20 ते 25 दिवसांनी पहिले खत दिले गेले पाहिजे.
मका पिकाला दर 20 ते 25 दिवसांनी पाणी द्यावे लागते. त्यावेळी त्यात खत टाकावे व त्यानंतर हलके पाणी द्यावे, असा सल्ला यावेळी कृषी तज्ञांनी दिला आहे.
सिंचनानंतर मक्याचे तण काढावे लागते. जेणेकरून उगवलेले तण सहज नष्ट होऊन मका पिकाला खत घालता येईल.
मक्याला पहिले खत कोणते द्यावे ?
कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, 40 ते 45 किलो युरियामध्ये कार्टॅप हायड्रोक्लोराईड 5 किलो आणि ह्युमिक ऍसिड 1 किलो प्रति एकर किंवा सागरिका 10 किलो प्रति एकर या प्रमाणात मिसळून मका पिकाला आळवणी करावी.
हे मिश्रण मक्याच्या मुळांजवळ दोन ते तीन इंच अंतरावर दिल्यास तुम्हाला यातून उत्तम परिणाम मिळतील. तथापि कोणत्याही खताचा वापर करण्यापूर्वी कृषी तज्ञांचा आणि कृषी सेवा केंद्र चालक यांचा एकदा सल्ला घेणे आवश्यक राहणार आहे.