Maize Farming: भारतात एकूण तीन हंगामात शेती (Agriculture) केली जाते. खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात भारतातील शेतकरी बांधव वेगवेगळ्या पिकांची लागवड करत असतात. मित्रांनो भारतात सध्या खरीप हंगाम (Kharif Season) प्रगतीपथावर आहे. या खरीप हंगामात शेतकरी बांधव (Farmer) मका, सोयाबीन कापूस या मुख्य पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करत असतात. मित्रांनो मक्याचे (Maize crop) क्षेत्र आपल्या महाराष्ट्रात देखील विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगामात मका पिकाची शेती (Cultivation Of Maize Crop) करून चांगले उत्पन्न कमवत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव बघायला मिळत आहे.
या आळीमुळे मक्याचे मोठे नुकसान होते आणि परिणामी उत्पादनात घट आणि शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत अमेरिकन लष्करी अळीचे वेळेचे व्यवस्थापन (Maize Crop Management) करणे अतिशय आवश्यक बनते. त्यामुळे आज आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी मका पिकासाठी घातक ठरणाऱ्या अमेरिकन लष्करी अळीचे कशा पद्धतीने व्यवस्थापन (Maize Pest Control) केले जाऊ शकते याविषयी बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत.
मका पिकासाठी घातक ठरणारी अमेरिकन लष्करी अळी
मित्रांनो जाणकार लोकांच्या मते, मका पिकासाठी घातक ठरणारी अमेरिकन लष्करी अळी मक्याच्या पानांवर आपली उपजीविका भागवत असते. अमेरिकन लष्करी अळी सुरुवातीच्या अवस्थेत आपली उपजीविका कोवळ्या पानांवर भागवत असते. नंतर लष्करी अळी मक्याच्या पोंग्यात घुसते आणि आतील भागावर आपली उपजीविका भागवत असते. अमेरिकन लष्करी अळी आपल्या दुसर्या व तिसर्या अवस्थेत पानाच्या कडेपासून ते आतपर्यंचा भाग खाऊन आपली उपजीविका भागवत असते.
नंतरच्या अवस्थेत या अमेरिकन लष्करी अळी मका पिकाच्या वाढीचा वरचा भाग खातात यामुळे मका पिकाला तुरा लागत नाही परिणामी मक्याला कणीस लागतच नाही. शिवाय ही अळी कोवळे कणीस देखील खात असते. अशा परिस्थितीत अमेरिकन लष्करी आळी मक्याच्या पिकाला आतून खात असल्याने तसेच कोवळे कणीस खात असल्याने मक्याच्या उत्पादनात कमालीची घट होते. त्यामुळे या अमेरिकन लष्करी अळी वर वेळेस नियंत्रण मिळवणे अतिशय आवश्यक ठरते.
अमेरिकन लष्करी अळीवर जैविक नियंत्रण कसं मिळवणार बरं…!
जाणकार लोकांच्या मते, अमेरिकन लष्करी अळीचे अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत. कृषी तज्ञ या अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एकरी पंधरा कामगंध सापळे बसवण्याचा देखील सल्ला देतात. अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसला की मक्याच्या पोंग्यात वाळू टाकण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने अळीला मक्याच्या वाढीचा भाग खाता येत नाही. शिवाय यामुळे शेंडा तुटणार नाही. मक्याच्या पिकाच्या सुरवातीच्या दिवसात साधारणतः एक महिन्यापर्यंत वाळू व चुना 9:1 या प्रमाणात टाकावे.
शिवाय एकरी दहा पक्षी थांबे बसवण्याचा देखील सल्ला दिला जातो. मका पिकात तण नियंत्रण करणे देखील महत्त्वाचे असते. शिवाय अमेरिकन लष्करी आळी ज्या मक्यावर सुप्तावस्थेत असेल त्या मक्याचे खोड छाटून पिकांचे अवशेष वावरा बाहेर फेकावे.
याशिवाय शेतकरी बांधव काही मित्र कीटकांच्या साहाय्याने देखील अमेरिकन लष्करी अळीचा नायनाट करू शकतात. जसे की, ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकांची एकरी 50,000 अंडी दहा दिवसांच्या अंतराने मक्याच्या शेतात सोडावे. हे एकूण तीनवेळा करावे.
याशिवाय नोमुरीया रायली 3 ग्रॅम किंवा मेटारायझिअम ॲनिसोप्ली 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी हे प्रमाण घेऊन यापैकी एका बुरशीजन्य कीटकनाशकाची फवारणी शेतकरी बांधव करू शकतात.
मित्रांनो येथे दिलेली माहिती ही कोणत्याही परिस्थितीत अंतिम राहणार नाही. शेतकरी बांधवांनी कोणत्याही पिकासाठी कोणत्याही औषधाची फवारणी करणे अगोदर तसेच कोणताही जैविक उपाय करणे अगोदर एकदा तज्ञ लोकांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे.