Maize Farming : भारतात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी बांधव (Farmer) नगदी पिकांची (Cash Crops) मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. मका (Maize Crop) हे देखील एक प्रमुख नगदी पीक असून या पिकाची खरीप (Kharif Season) आणि रब्बी हंगामात संपूर्ण भारतवर्षात लागवड केली जाते.
या पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. मित्रानो मका हे जरी खरीप आणि रब्बी हंगामात लावले जात असले तरी आपल्या महाराष्ट्रात या पिकाची खरीप हंगामात सर्वाधिक शेती केली जाते. भारतीय बाजारपेठेत मक्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असून बाजारात मक्याला चांगला बाजारभाव (Maize Rate) देखील मिळत आहे.
अशा परिस्थितीत मका उत्पादक शेतकरी बांधवांना (Farmer) मक्याच्या लागवडीतून चांगला बक्कळ पैसा (Farmer Income) मिळत आहे. मित्रांनो मक्याचा वापर अन्नधान्य तसेच पशु साठी चारा म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो.
यामुळेच दुप्पट फायदा देणाऱ्या मका पिकाची लागवड आपल्या देशातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात करत असतात. मात्र असे असले तरी मका पिकातून देखील चांगले उत्पादन मिळविण्यासाठी इतर पिकांप्रमाणेच सुधारित वाणांची पेरणी करणे अतिशय आवश्यक असते.
मित्रांनो आता भारतीय वैज्ञानिकांनी मका उत्पादक शेतकरी बांधवांचे मक्याचे उत्पादन वाढवण्यासाठी नवीन जाती (Maize Variety) विकसित केल्या आहेत. त्यामुळे भारत वर्षातील संपूर्ण मका उत्पादक शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
मक्याच्या नवीन हायब्रीड किंवा संकरित जाती खालील प्रमाणे:-
देशातील मका उत्पादक शेतकरी बांधवांना व्यावसायिक लागवडीसाठी देशातील शास्त्रज्ञांनी मकाच्या काही नवीन जाती विकसित केल्या असून त्या जारी कारण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मक्याच्या संकरित वाणांचा समावेश आहे.
यामध्ये कमी फायटिक अॅसिड पीएमएच-1 एलपी या वाणाला अधिक पसंती दर्शवली जात आहे. वैज्ञानिकांनी देखील या जातीचे विशेष गुणगान गायले आहेत. याशिवाय नव्याने विकसित झालेल्या हायब्रीड मक्याच्या जातीत IMH-222, IMH-223 आणि IMH-224 या सुधारित वाणांचाही समावेश आहे.
PMH1-LP जात होत आहे विशेष लोकप्रिय
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मक्याचे उत्तम उत्पादन मिळवण्यासाठी, देशभरातील बहुतेक शेतकरी पीएमएच-1 या जातीची लागवड करतात, जी पंजाब कृषी विद्यापीठाने 2007 मध्ये विकसित केली होती आणि लॉन्च केली होती.
आता ही जात विकसित करून सुधारित आवृत्ती PMH-1 LP लाँच करण्यात आली आहे. फायटीड ऍसिडची कमी उपलब्धता असलेली ही जात उत्तर-पश्चिम मैदानी प्रदेशासाठी सर्वात योग्य असेल.
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्लीच्या लगतच्या भागात पीएमएच-1 एलपी जातीची व्यावसायिक लागवड करून शेतकरी 95 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळवू शकतात.
तज्ञांच्या मते, PMH-1 LP जातीमध्ये 36% कमी फायटिक ऍसिड आहे आणि मागील PMH-1 च्या तुलनेत 140% पर्यंत अजैविक फॉस्फेटची उपलब्धता आहे.
या जातीची लागवड केल्यास मका पिकावर रोग येणार नाहीत
IIMR, लुधियाना (IIMR, Ludhiana) ने लाँच केलेल्या PMH-1 LP च्या पिकामध्ये देखील कीटक-रोग होण्याची शक्यता कमी आहे.
ही जात मेडीस लीफ ब्लाइट, टर्सिकम लीफ ब्लाइट, चारकोल रॉट यांसारख्या पिकांच्या रोगांपासून संरक्षणात्मक कवच म्हणून काम करते.
याशिवाय यां जातीच्या मका पिकात स्टेम बोअरर आणि फॉल आर्मीवॉर्म यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते.
या नवीन वाणाचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार आहे
जाणकार लोकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, मक्याच्या या नवीन चार संकरित जाती अन्नाबरोबरच चाऱ्याची गरज भागवण्यास सक्षम आहेत. विशेषत: पोल्ट्री क्षेत्रात याचा उपयोग कोंबड्यांना खाद्य म्हणून होणार आहे. या जाती फायटिक ऍसिडचे प्रमाण कमी आणि लोह आणि जस्त यांसारख्या खनिजांनी समृद्ध आहेत.