Mahavitaran Yojana : वीजबिलालामुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांना नवीन वर्षात एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. आज पासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महावितरण कडून ग्राहकांसाठी एक गुड न्यूज हाती आलीये. ती म्हणजे महावितरणने एक नवी योजना सुरू केली असून या अंतर्गत वीज ग्राहकांना नवीन वर्षामध्ये वीजबिलात 120 रुपयांची सूट मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महावितरण्य ग्राहकांना गो ग्रीन हा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. ग्राहकांनी जर विज बिल भरताना हा पर्याय निवडला तर त्यांना वीज बिलावर 120 रुपयांची सूट दिली जाणार आहे. खरे तर, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महावितरण कडून ही योजना राबवली जात आहे.
कागद वाचवा पर्यावरण वाचवा ही संकल्पना डोळ्यापुढे ठेवून महावितरणने गो ग्रीन नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महावितरण आपल्या ग्राहकांना प्रति वीजबिला मागे दहा रुपयांची सूट देते. अशा तऱ्हेने जानेवारी ते डिसेंबर 2025 या 12 महिन्यांच्या काळात विज बिल ग्राहकांना 120 रुपयांची मोठी सूट मिळणार आहे.
ही 120 रुपये एकरकमी सवलत दिली जाणार आहे. मंडळी, गो-ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिलाऐवजी ई-मेलद्वारे वीजबिल पाठवण्यात येते. शिवाय गो-ग्रीन ग्राहकांना मासिक वीजबिलात 10 रुपये सूट देण्यात येते.
महावितरणच्या 3 कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापपर्यंत 4 लाख 62 हजार म्हणजेच 1.15 टक्के ग्राहकांनी गो-ग्रीन सेवेचा पर्याय निवडला असल्याचे सांगण्यात येते आहे. यामुळे जर तुम्ही अजून पर्यंत या सेवेचा लाभ घेतलेला नसेल तर तुम्ही सुद्धा या सेवेचा लाभ घेऊ शकता आणि तुमचे विजू बिल तुम्ही कमी करू शकता.
या योजनेमुळे अर्थातच महावितरणच्या नव्या सुविधेमुळे विज बिल तर कमी होणारच आहे शिवाय पर्यावरणाच्या संवर्धनात तुम्ही मोलाचा वाटा देखील उचलणार आहात. यामुळे या संकल्पनेत, या योजनेत तुम्ही नक्कीच सहभागी झाले पाहिजेत.
गो-ग्रीन सुविधेत ग्राहकांना WSS च्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर ई-बिल मिळेल. (https://wss.mahadiscom.in/wss/wss ) आणि प्रत्यक्ष प्रत मिळणार नाही. जर तुम्हाला यामध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर https://wss.mahadiscom.in/wss/wss या संकेतस्थळावर तुम्ही नोंदणी करू शकता.