Maharashtra Weather Update : गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून राज्यातुन गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा महाराष्ट्रात दस्तक देणार असे सांगितले जात आहे. राज्यात 18 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने नुकताच व्यक्त केला आहे.
१८ ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान राज्यात बहुतांशी भागात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील 17 ऑगस्ट पासून ते 22 ऑगस्ट पर्यंत राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
पंजाबरावांनी हे सहा दिवस राज्यातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, बीड, पंढरपूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, संगमनेर या भागात मोठा पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
या भागामध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त राज्यातील उर्वरित भागातही पाऊस होणार असा त्यांचा अंदाज आहे. विशेष बाब अशी की 25 ते 30 ऑगस्ट दरम्यान पुन्हा राज्यात पाऊस होणार अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
तसेच पंजाबरावांनी अहमदनगर आणि नाशिक भागात जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला नसल्याने आता त्या भागात मोठा पाऊस पडण्याची दाट शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अशातच मात्र स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने महाराष्ट्रातील हवामानाबाबत एक मोठी धक्कादायक माहिती दिली आहे.
स्कायमेटने आगामी दोन आठवडे राज्यात मान्सून कमजोर राहणार असल्याचा मोठा अंदाज व्यक्त केला आहे. स्कायमेट वेदर सर्विसेसचे अध्यक्ष जी. पी. शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे पुढील दोन आठवडे मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून कमजोर राहणार आहे.
दख्खनच्या पठारासह संपूर्ण महाराष्ट्रात अशीच परिस्थिती पाहायला मिळणार असून पुढील दहा दिवस महाराष्ट्रात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. पण पुढील १० दिवसांमध्ये बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा आणि पूर्व मध्य प्रदेशात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
काही हवामान तज्ञांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक राहणारा असा अंदाज व्यक्त केला आहे. निश्चितच आगामी काही दिवस जर पाऊस पडला नाही तर खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.