Maharashtra Weather Update : महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मान्सूनने एक्झिट घेतली आहे. मान्सून माघारी फिरल्यापासून मात्र देशातील विविध राज्यांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर हिटची झळ नागरिकांना बेजार करत आहे. ऑक्टोबर हिटमुळे नागरिक अक्षरशः घामाघुम होत आहेत.
वातावरणातील आद्रता नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून आता नागरिकांच्या माध्यमातून थंडीला केव्हा सुरुवात होणारा हा प्रश्न विचारला जात आहे. महाराष्ट्रात कडाक्याची थंडी केव्हा पडणार असा सवाल नागरिकांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याबाबत भारतीय हवामान खात्यातील तज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी राज्यात थंडीला केव्हा सुरुवात होईल याबाबत अपडेट दिली आहे. साबळे यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात आता लवकरच थंडीला सुरुवात होणार आहे. या चालू ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कमाल आणि किमान तापमानात घट येण्याची शक्यता आहे.
मात्र खऱ्या अर्थाने जोरदार थंडीला सुरुवात 15 नोव्हेंबर पासून होईल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. विशेष म्हणजे राज्यातील काही भागात आता थंडीला सुरुवात देखील झाली आहे. जम्मू काश्मीर मध्ये बर्फवृष्टी सुरू झाली असल्याने याचा परिणाम म्हणून राज्यातील उत्तर भागात म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात थंडीला सुरुवात झाली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअस पर्यंत खाली आल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. याशिवाय महाबळेश्वरचे किमान तापमान हे 17 अंश सेल्शिअस पर्यंत खाली आले आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रातील थंड हवामानाचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर पेक्षा जळगाव जिल्ह्याचे किमान तापमान हे कमी आहे.
यामुळे महाबळेश्वरपेक्षा जळगाव मध्ये सध्या स्थितीला थंडी अधिक भासत आहे. मात्र असे असले तरी दिवसाचे तापमान अर्थातच कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस पर्यंत कायम आहे. यामुळे मात्र दिवसा उकाडा जाणवत आहे तर रात्रीला थंडीची वाढू लागली आहे. दसऱ्यानंतर सकाळच्या तापमानात घट होणार आहे आणि कमाल तापमान सरासरी एवढे राहणार आहे.
यामुळे दसऱ्यानंतर हळूहळू थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान 15 नोव्हेंबर पासून ते जानेवारी अखेर पर्यंत थंडीचा जोर राज्यात कायम राहील असा अंदाज आहे. एकंदरीत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. मात्र आज पासून हळूहळू थंडी पडण्यास सुरुवात होणार आहे.