Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील विविध भागांमध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. आपल्या महाराष्ट्रातही विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट पाहायला मिळत आहे.
याचा परिणाम म्हणून रब्बी हंगामातील पिकांना नवीन संजीवनी मिळाली आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला होता.
आता मात्र थँडीचा जोर वाढत असल्याने रब्बी पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने केलेल्या माहितीनुसार मंगळवारपासून अर्थातच आजपासून देशातील विविध राज्यांमधील किमान तापमान पुन्हा एकदा कमी होणार आहे.
परिणाम म्हणून देशात पुन्हा एकदा थंडीच्या तीव्रतेमध्ये वाढ होईल अशी आशा आहे. महाराष्ट्रासहित उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मध्ये देखील कारखा वाढू लागला आहे.
एकीकडे देशाच्या उत्तरेकडील भागांमध्ये थंडीची लाट आली आहे तर दुसरीकडे देशाच्या दक्षिण भागाचा अजूनही मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
दरम्यान आगामी काही दिवस इथे असाच पाऊस पडत राहणार असा अंदाज आहे. तामिळनाडू मध्ये विशेषता येथील किनारपट्टी भागात मध्यम ते हलका पाऊस बरसणार असा अंदाज देण्यात आला आहे.
30 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 पर्यंत किनारपट्टीवर तामिळनाडूवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज IMD ने दिला आहे.
त्यासोबतच 27 आणि 28 डिसेंबरला तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये सुद्धा काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडेल असे सांगितले गेले आहे.
दुसरीकडे आपल्या महाराष्ट्राच्या हवामानाबाबत बोलायचे झाले तर आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने हवामान कोरडे राहणार आहे.
एवढेच नाही तर राज्यात आता थंडीची तीव्रता आणखी वाढणार आहे. यामुळे राज्यातील रब्बी हंगामातील पिकांना पुन्हा एकदा पोषक हवामान तयार होणार असे बोलले जात आहे.