Maharashtra Weather Update : 25 सप्टेंबर पासून देशातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पश्चिम राजस्थानमधून सुरू झालेला हा परतीचा प्रवास सुरु झाला आणि आता देशातील विविध राज्यांमधून मानसूनने माघार घेतली असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
महाराष्ट्राचा विचार केला असता आत्तापर्यंत निम्म्या महाराष्ट्राला मान्सूनने टाटा बाय बाय केले आहे. शिवाय येत्या काही दिवसात उर्वरित महाराष्ट्रातूनही माणूस माघारी फिरणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
याचा परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रात तापमानात मोठी वाढ झाली आहे. राज्यात दिवसा तापमान वाढत आहे आणि रात्री गारवा सुटत आहे. कमाल तापमानात वाढ झाली असल्याने पुण्यासह राज्यातील विविध भागात ऑक्टोबर हिटचा अनुभव नागरिकांना येत आहे.
पुणे, मुंबईमधून मान्सूनची माघार
खरंतर, यावर्षी महाराष्ट्राच्या मुख्य भूमीत म्हणजेच तळ कोकणात मान्सूनचे ऊशिराने आगमन झाले. दरवर्षी सात अजुनीच्या सुमारास तळकोकणात मानसून येतो. यंदा मात्र उशिराने दाखल झाला शिवाय अनुकूल वातावरण नसल्याने तळ कोकणात मान्सूनचा बरेच दिवस मुक्काम राहिला.
यानंतर 25 जूनच्या सुमारास संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील काही भागात चांगला पाऊस झाला.परंतु मानसून उशिराने दाखल झाला होता म्हणून जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली.
जुलै महिन्यात मात्र राज्यात चांगला पाऊस झाला. यानंतर ऑगस्ट महिन्यात जवळपास 20 ते 25 दिवस पावसाचा खंड पडला. यामुळे राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली.परंतु सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या पुन्हा एकदा आशा पल्लवीत झाल्यात.
सप्टेंबर मध्ये राज्यातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. याचा परिणाम म्हणून राज्यातील प्रमुख धरणांच्या पाण्याच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. पण यावर्षी मान्सूनने सरासरी गाठलेली नाही. यंदा महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यापर्यंत सरासरीच्या 96 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.
अशातच आता महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून आत्तापर्यंत पुणे, मुंबईसह राज्यातील 50% भागातून मान्सून माघारी फिरला आहे. शनिवार पर्यंत निम्म्या महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरला होता मात्र रविवारी मोसमी वाऱ्यांची कुठलीच प्रगती झाली नाही. पण आता या आठवड्याच्या सुरुवातीलाच राज्यातील बहुतांशी भागातून मान्सून माघारी फिरणार आहे.
चार-पाच दिवस महाराष्ट्रात कुठेच पाऊस पडणार नाही
दरम्यान, हवामान खात्याने पुढील चार-पाच दिवस महाराष्ट्रातील कोणत्याच भागात पावसाची शक्यता वर्तवलेली नाही. म्हणजेच आगामी चार-पाच दिवस राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. परंतु चार-पाच दिवसानंतर परिस्थिती बदलेल आणि पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. चार-पाच दिवसानंतर महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडू शकतो असे हवामान खात्याने सांगितले आहे.