Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण भारतवर्षात पावसाचा (Rain) त्राहिमाम् बघायला मिळत आहे. आपल्या राज्यातही गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस (Rain Alert) सुरूच आहे. आता भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार, आजही मुसळधार पावसाची प्रक्रिया महाराष्ट्र राज्यात सुरूच राहणार आहे.
मित्रांनो हवामान खात्यानुसार, आज मध्य महाराष्ट्रातील पुणे तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Monsoon) कोसळणार असून या वर नमूद केलेल्या जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचीची (Monsoon News) शक्यता असल्याचे देखील भारतीय हवामान विभागाकडून सांगितले गेले आहे.
अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन मुंबई हवामान विभागाने आज या संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. मित्रांनो भारतीय हवामान विभागाच्या मते आज 18 ऑगस्ट रोजी पुणे वगळता अन्य नमूद केलेल्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून त्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्याच वेळी भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, थोडासा दिलासा देखील मिळाला आहे. कारण की, 19 आणि 20 ऑगस्टसाठी हवामान खात्याने कोणताही इशारा जारी केलेला नाही. मात्र, या काळात हलका पाऊस सुरू राहू शकतो असे देखील नमूद करण्यात आले आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, याआधी मंगळवारी देखग आपल्या राज्यात पाऊस सुरूच होता. संततधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात जनजीवन विस्कळीत असल्याचे चित्र आहे. शिवाय राज्यात सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे देखील अतोनात नुकसान होत आहे.
शेतकरी बांधवांच्या मते अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळत असल्याने पिकांची मोठी नासाडी होत आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने तसेच धरणातील पाण्याचा विसर्ग राज्यात सातत्याने सुरू असल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.